Nissan Magnite SUV bookings cross 60000 mark know price and features Details here
छोट्या आणि स्वस्त SUV ची ग्राहकांमध्ये मोठी क्रेझ; आतापर्यंत ६० हजारांपेक्षा अधिक गाड्यांचं बुकिंग By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 7:27 PM1 / 10कॉम्पॅक्ट आणि लहान एसयूव्ही वाहनांची विक्री भारतीय बाजारात सातत्याने वाढत आहे. हॅचबॅक आणि सेडान कारपेक्षा लोक या सेगमेंटला अधिक प्राधान्य देत आहेत. Nissan च्या सर्वात स्वस्त SUV Magnite ला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 2 / 10दरम्यान, जेव्हा ही एसयुव्ही लाँच करण्यात आली, तेव्हापासून आतापर्यंत या कारची ६० हजारांपेक्षा अधिक युनिट्सचं बुकिंग नोंदवलं गेलं असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. 3 / 10निसान इंडियाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मॅग्नाइट एसयूव्ही सादर केली. लॉन्चच्या वेळी, या एसयूव्हीची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी होती, परंतु आता त्याची किंमत 5.59 लाख ते 10.00 लाखांच्या दरम्यान आहे. आपल्या ग्राहकांना सातत्यानं उत्तम सेवा देण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं निसान इंडिया कडून सांगण्यात आलं. 4 / 10कंपनी निसान कॉस्ट कॅल्क्युलेटर, निसान 'बुक अ सर्व्हिस' आणि निसान 'पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ' सेवा यासारख्या सेवाही देते. नवीन निसान मॅग्नाईटच्या टॉप व्हेरियंट्सचे XV आणि XV (प्रीमियम) या कारला ६० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांनी पसंती दर्शवल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 5 / 10या व्यतिरिक्त, सुमारे 30 टक्के लोकांनी CVT ऑटोमॅटिक व्हेरिअंटचा पर्याय निवडला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कारचं ऑनलाइन बुकिंगही मोठ्या प्रमाणात होत आहे. 6 / 10महत्त्वाचं म्हणजे बुकिंग आणि सेल्स या दोन्ही निराळ्या गोष्टी आहेत. अनेकदा ग्राहक आपली बुकिंग रद्दही करतात. त्यामुळे बुकिंग आणि विक्री याच्या आकडेवारीत तफावत असणं ही सामान्य प्रक्रिया आहे. 7 / 10Nissan Magnite च्या एका व्हेरिअंटमध्ये कंपनीनं 1.0 लीटर क्षमतेच्या टर्बो पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 99bhp ची पॉवर आणि 160Nm चा टॉर्क जनरेट करते. हे व्हेरिअंट 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह बाजारात उपलब्ध आहे. 8 / 10याशिवाय ही एसयुव्ही 1 लीटर नॅचरल एक्सपायर्ज पेट्रोल इंजिनसहदेखील उपलब्ध आहे. ते इंजिन 71bhp ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क जनरेट करतं.9 / 10या एसयुव्हीमध्ये त्यांच्या सेगमेंटनुसार उत्तम फिचर्स देखील मिळतात. यात एलईडी स्कफ प्लेट, अॅम्बियंट मूड लाइटिंग, पॅडल लँप, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर मिळतात. 10 / 10याशिवाय, कंपनीने XV प्रीमियम व्हेरिएंटमध्ये निसान कनेक्टेड टेक्नॉलॉजीचा समावेश केला आहे, जे ऑटोमेटेड रोड साइड असिस्टन्स, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हेइकल हेल्थ इन्फो, जिओ फेंस, स्पीड अलर्ट आणि व्हेइकल स्टेटस सारखी फीचर्सही मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications