nitin gadkari to invite hardsells model to small depositors know details
नितीन गडकरींनी छोट्या गुंतवणूकदारांसाठी आणलाय भन्नाट प्लान; FD पेक्षा २-३ टक्के अधिक रिटर्न! By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:22 PM1 / 9आपल्याकडे पारंपरिक मुदत ठेव ते म्युच्युअल फंडापर्यंत गुंतवणुकीचे अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. अगदी शेअर मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार असल्याचे पाहायला मिळते. 2 / 9मात्र, काही छोट्या गुंतवणूकदारांना मोठी गुंतवणूक करणे शक्य नसते. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी छोट्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आणला आहे.3 / 9रस्ते वाहतूक मंत्रालय सध्या भांडवली बाजार नियामक सेबीशी चर्चा करत आहे, जेणेकरुन ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांची बचत पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवता येईल. यासाठी लहान गुंतवणूकदारांसाठी इनविट मॉडेल बनवण्याबाबत बोलणी सुरू आहेत, असे गडकरींनी सांगितले.4 / 9भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (PGCIL) ने सार्वजनिक क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) ऑफर केली आहे.5 / 9गुंतवणूकदारांना इनविट (InvIT) मध्ये गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा दोन-तीन टक्के जास्त परतावा मिळेल. मी माझ्या अधिकार्यांशी याबाबत बोलत आहे आणि ते भांडवली बाजार नियामक सेबीची परवानगी घेण्याचाही प्रयत्न करत आहेत.6 / 9आम्हाला सेबीची परवानगी मिळाली, तर छोटे गुंतवणूकदार इनविट (InvIT) मध्ये गुंतवणूक करू शकतील. आम्हाला बँकांचे नुकसान करायचे नाही, पण लहान गुंतवणूकदारांना बँक एफडीमध्ये जेवढे रिटर्न मिळतात, त्यापेक्षा २-३ टक्के जास्त परतावा इनविटमध्ये मिळेल. 7 / 9जर लहान गुंतवणूकदारांना हवे असेल, तर ते त्यांच्या व्याजाची रक्कम दरमहा घेऊ शकतात. सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आपली बचत बँकेत ठेवतात, त्यावर व्याजदर सातत्याने घसरत असतात. देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठी समस्या बनली आहे. 8 / 9त्यामुळे माझी इच्छा आहे की, जर लहान गुंतवणूकदारांनी इनविट मॉडेलमध्ये गुंतवणूक केली, तर त्यांचा पैसा देशातील पायाभूत सुविधांमध्ये वापरला जाईल आणि त्यांना चांगला परतावाही मिळेल. आम्हाला इनविटमध्ये गुंतवणूकदारांची संख्या वाढवायची आहे.9 / 9ईपीएफओने फक्त सार्वजनिक क्षेत्रातील इनविटमध्ये पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुंतवणुकीत विविधता येईलच, पण त्यात धोकेही आहेत. लहान गुंतवणूकदारांसाठी इनविट मॉडेल बनवण्याबाबत बोलणी सुरू आहेत, असे गडकरींनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications