No Cost EMI: Nothing free, understand the math; Otherwise, a heavy price will have to be paid
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 4:30 PM1 / 7होम अप्लायन्स, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी खरेदी करताना ग्राहकांना अनेकदा No Cost EMI चा पर्याय दिला जातो. नो कॉस्ट ईएमआयद्वारे ग्राहकाला व्याजमुक्त हप्त्यांमध्ये वस्तू खरेदी करण्याची सुविधा मिळते. ही डील ग्राहकांना फायदेशीर वाटते, कारण No Cost EMI द्वारे ते आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात आणि त्यांना एकरकमी पैसेही द्यावे लागत नाही. शिवाय, भरलेल्या पैशावर 0 % व्याज आकारले जाते.2 / 7 मात्र, शून्य टक्के व्याजाच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेचे नियम सांगतात की, कर्जाच्या बाबतीत अशी कोणतीही सुविधा नाही. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुम्हाला ते व्याजासह परत करावे लागेल. आता विचार करण्याची गोष्ट म्हणजे, ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआयच्या नावावर व्याजमुक्त हप्ते भरण्याची सुविधा कशी मिळते? ही ऑफर फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे का? नो कॉस्ट ईएमआयचे गणित समजून घेऊ...3 / 7 No Cost EMI ऑफर करण्यापूर्वीही कंपन्या त्या उत्पादनावर चांगली सूट घेतात. तुम्हाला ऑफर केलेल्या किंमतीमध्ये डिस्काउंट समाविष्ट केलेला नसतो. उदाहरणासह समजून घ्या- समजा तुम्ही शोरूममधून 25 हजार रुपयांचा मोबाइल खरेदी करत आहात. No Cost EMI सुविधेचा लाभ घेऊन 25,000 ची रक्कम EMI मध्ये रुपांतरित केली. 4 / 7 तुम्हाला वाटते की, तुमच्याकडून प्रोडक्टची अचूक किंमत वसूल केली जात आहे. परंतु विक्रेत्याने त्या प्रोडक्टवर आधीच डिस्काउंट मिळवलेला असतो. विक्रेत्याने 25,000 रुपयांचा मोबाइल 18,000 किंवा 20,000 रुपयांना विकत घेतलेला असतो. अशा परिस्थितीत, जेव्हा कंपनी तुम्हाला ऑफर केलेल्या किंमतीवर EMI पर्याय देते, तेव्हा कंपनीचे कोणतेही नुकसान होत नाही, उलट ते नफ्यातच राहतात.5 / 7 याशिवाय, सणासुदीच्या काळात त्या उत्पादनावर सूट किंवा ऑफर दिली गेली असेल, तर तुम्हाला ती सूट No Cost EMI मध्ये मिळत नाही. याचा अर्थ, जर एखाद्या उत्पादनाच्या विक्रीवर 10 टक्के किंवा 20 टक्के सूट दिली जात असेल, तर तुम्हाला त्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एकरकमी किंमत मोजावी लागते. तुम्ही No Cost EMI सुविधेसह उत्पादन खरेदी केल्यास तुम्हाला ती सूट मिळत नाही. याशिवाय, नो कॉस्ट ईएमआयच्या सुविधेचा लाभ घेताना, तुमच्याकडून प्रक्रिया शुल्कदेखील आकारले जाते. याशिवाय, 18% GST आणि बँकेचा सर्व्हिस चार्जही वसूल केला जातो.6 / 7 या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियम सांगतात की, कर्जाच्या बाबतीत FREE LUNCH अशी कोणतीही सुविधा नसते. तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते व्याजासह परत करावे लागेल. हेच कारण आहे की, जेव्हा तुम्ही बँकेकडून कोणतेही कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज किंवा वाहन कर्ज इत्यादी घेता, तेव्हा तुमचा हफ्ता व्याजासह मोजला जातो. 7 / 7 तर क्रेडिट कार्डच्या No Cost EMI योजनेत व्याजाची रक्कम प्रक्रिया शुल्काच्या स्वरुपात वसूल केली जाते. No Cost EMI बाबत आरबीआयने बँकांना स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, अशा कर्जांमधील व्याजदरांबाबत कोणतीही पारदर्शकता नाही, त्यामुळे अशी कोणतीही ऑफर टाळली पाहिजे. पण, ग्राहकांची मागणी किंवा इतर काही कारणास्तव, कंपन्या अशा ऑफर देत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications