शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ना OTP ची झंझट, ना PIN लक्षात ठेवायचं टेन्शन; आधार कार्डावरून असे पाठवा मिनिटांत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 9:26 AM

1 / 10
तुमचे आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र नाही तर त्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फायद्याबद्दल सांगत आहोत. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण तुमचे आधार कार्ड तुमच्यासाठी एटीएम कार्ड म्हणून काम करू शकते.
2 / 10
होय, तुमच्या आधार कार्डच्या मदतीनं तुम्ही पैसे काढणं, जमा करणं, शिल्लक तपासणं यासारख्या गोष्टी देखील करू शकता, तेही बँकेत न जाता. BHIM युझर्स आधार क्रमांकाच्या मदतीनं पैशांचे व्यवहारही करू शकतात.
3 / 10
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आधारच्या मदतीनं पैशांचे व्यवहार सोपे करण्यात आले आहेत. तुम्ही फक्त काही स्टोप्स फॉलो करून तुमचे आधार तुमचे एटीएम बनवू शकता. जाणून घेऊ त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया.
4 / 10
जर तुम्हाला तुमच्या आधारच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. वास्तविक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आधारसोबत हे फीचर विकसित केले आहे.
5 / 10
यामध्ये तुम्हाला आधार अनेबल्ड पेमेंट सिस्टमची (Aadhaar Enabled Payment System) ची सुविधा मिळते. या प्रणालीच्या मदतीने तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून डिजिटल व्यवहार करू शकता. मात्र, यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंटच्या मदतीनं व्हेरिफिकेशन करावं लागेल. हे पेमेंट फीचर अतिशय सुरक्षित आहे. यासाठी तुमच्या बँक तपशीलांची आवश्यकता नाही.
6 / 10
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते आधारशी लिंक करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. एकदा तुम्ही तुमचं बँक खाते आधारशी लिंक केल्यानंतर, तुम्ही या आधार बेस्ड पेमेंट सिस्टमचा लाभ घेऊ शकता.
7 / 10
या व्यवहार प्रक्रियेत तुम्हाला ओटीपीची गरज नाही किंवा पिन टाकण्याची गरज नाही. तुम्हाला हवेंअसल्यास, तुम्ही एक आधार कार्ड अनेक बँक खात्यांशी लिंक करू शकता. AePS प्रणालीच्या मदतीने तुम्ही सहजरित्या पैसे काढू शकता, जमा करू शकता किंवा ट्रान्सफर करू शकता. तुम्ही बँकेत न जाता या सेवेचा लाभ घेऊ शकता.
8 / 10
आधार कार्डसह उपलब्ध असलेल्या AePS सुविधेच्या मदतीने तुम्ही सहजपणे पैशांचे व्यवहार करू शकता. कोणालाही पैसे पाठवू शकतात. बँक खात्यात पैसे जमा करू शकता. आपण मिनी स्टेटमेंट तपासू शकता. EKYC बेस्ट फिंगर डिटेक्शनचा लाभही घेऊ शकता.
9 / 10
तुम्ही बँकिंग करस्पाँडंट किंवा जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन या सेवेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही बँकिंग करस्पाँडंटला भेट देऊन किंवा घरी बोलावून याबद्दल माहिती घेऊ शकता. याशिवाय, तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ऑपरेटर्ससोबत आधार व्यवहारांची सुविधाही मिळेल. ही सेवा वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील बँकिंग करस्पॉन्डंट किंवा CSC केंद्राला भेट द्यावी लागेल.
10 / 10
यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक ओपीएस मशीनमध्ये टाकावा लागेल. तुम्हाला आवश्यक असलेली बँकिंग सेवा निवडा जसे की रोख पैसे काढणे, केवायसी किंवा शिल्लक तपासणी. जर तुम्हाला रोख रक्कम काढायची असेल तर रक्कम आणि बँकेचे नाव टाका. बायोमेट्रिक पडताळणीनंतर तुमचा व्यवहार पूर्ण होईल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMONEYपैसाbankबँक