शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पैशांची चणचण, रेल्वे स्टेशनवर काढले दिवस; ₹१००० वरून उभी केली ₹३५००० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 9:46 AM

1 / 7
वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. नशीब कधीही कोणाला कोणत्याही उंचीवर नेऊ शकतं. एक वेळ अशी आली की त्यांना अनेक रात्री रेल्वे स्टेशनवर झोपून घालवाव्या लागल्या. त्यांच्याकडे राहण्यासाठी घरही नव्हतं, पण सत्यनारायण नुवाल (Satyanarayan Nuwal) यांनी या अडचणींसमोर हार मानली नाही. परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपलं नशीब बदललं.
2 / 7
एकेकाळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून दिवस काढणाऱ्या सत्यनारायण नुवाल यांनी मेहनतीच्या जोरावर आपलं नशीब पालटलं आणि त्यांनी आज ३५ हजार कोटींची कंपनी उभी केली. आज आपण सोलार इंडस्ट्रीजचे (Solar Industries) मालक सत्यनारायण नुवाल यांचा प्रवास जाणून घेणार आहोत.
3 / 7
एका सामान्य मध्यमवर्गीय राजस्थानी कुटुंबात जन्मलेल्या सत्यनारायण नुवाल यांचे वडील सरकारी कार्यालयात कारकून होते. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या एवढ्या होत्या की दहावी पास झाल्यावर त्यांनी शाळा सोडली आणि नोकरीच्या शोध सुरू केला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढल्यानं ते चांगल्या नोकरीच्या शोधात राजस्थानातून महाराष्ट्रात आले. त्यांच्या खिशात ना पैसे होते ना डोक्यावर छत.
4 / 7
नोकरी न मिळाल्यानं त्यांना अनेक आठवडे रेल्वे स्टेशनवर झोपावं लागलं. एके दिवशी त्यांची भेट अब्दुल सत्तार अल्ला भाई यांच्याशी झाली. त्याच्याकडे स्फोटकांचा परवाना आणि मॅगझीन होते. मॅगझिन ही अशी जागा आहे जिथे स्फोटके ठेवली जातात. अब्दुल सत्तार यांच्याकडे परवाना होता, मात्र ते तो व्यवसाय करत नव्हते.
5 / 7
त्यावेळी स्फोटकांचा तुटवडा होता. अब्दुल सत्तार यांना एक हजार रुपये भाडं देऊन त्यांनी परवाना घेतला. इथून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. तो लोकांना स्फोटकांसाठी भाड्यानं जागा उपलब्ध करून देत असच. विशेषतः कोळशाच्या खाणींमध्ये वापरण्यात येणारी स्फोटकं तिकडे ठेवली जायची. नंतर याची निर्मिती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
6 / 7
नंतर त्यांनी आपला व्यवसाय नागपुरात हलवला. त्यांची वेस्टर्न कोलफिल्डशी जवळीक वाढू लागली. ते डीलर्सकडून २५० रुपयांना स्फोटके खरेदी करायचे आणि ८०० रुपयांना विकायचे. त्यांना चांगला नफा मिळू लागला. त्यांनी व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरुवात केली. जेव्हा डीलर्समध्ये स्पर्धा वाढू लागली तेव्हा त्यांना स्वत: स्फोटके बनवायला सुरुवात करावी लागली. १९९५ मध्ये त्याने पहिले युनिट सुरू केले.
7 / 7
सोलर एनर्जी इंडस्ट्रीजची सुरूवात केल्यानंतर त्यांना १९९६ साली वार्षिक ६ हजार टन स्फोटकं तयार करण्याचा परवाना मिळाला. त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज त्यांच्या कंपनीत ७,५०० लोक काम करतात. त्यांची कंपनी सोलर एनर्जी इंडस्ट्रीज ही ३६ कोटींहून अधिक किमतीची कंपनी बनली आहे. फोर्ब्स १०० च्या यादीत असलेल्या सत्यनारायण नुवाल यांची एकूण संपत्ती सध्या १.८ बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी