शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता UPI द्वारे पैसे भरण्यासाठी फोनची गरज नाही! फक्त 'ही' रिंग काम करेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 5:06 PM

1 / 7
बदलत्या काळात, UPI पेमेंट सिस्टम आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनली आहे. UPI पेमेंटसाठी मोबाईल फोनची आवश्यकता असते.
2 / 7
आता तुम्ही मोबाईल फोनशिवाय फक्त एका रिंगने UPI पेमेंट करू शकता.
3 / 7
केरळमधील तिरुवनंतपुरम येथील एसीमनी या स्टार्टअप कंपनीने हा पर्याय सादर केला आहे, याद्वारे तुम्ही फोन न वापरताही तुमचे UPI पेमेंट करू शकता.
4 / 7
एसीमनीची स्मार्ट रिंग लॉन्च करण्यामागील कारण म्हणजे तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर तुम्ही स्मार्ट रिंगद्वारेच व्यवहार सहज करू शकता.
5 / 7
ही विशेष अंगठी झिरकोनिया सिरॅमिकपासून बनविली आहे यामुळे कोणत्याही स्क्रॅचचा परिणाम होणार नाही.
6 / 7
ही रिंग वापरण्यासाठी तुम्हाला फोनची गरज नाही. यामध्ये फक्त पेमेंट टर्मिनलवर ठेवावे लागते.
7 / 7
यानंतर, पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला बीप ऐकू येईल आणि त्यानंतर फोनशिवाय पेमेंट केले जाईल.