शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त दागिनेच नाही, 'या' ५ मार्गांनीही तुम्ही सोनं खरेदी करु शकता; जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:29 AM

1 / 9
प्राचीन काळापासून भारतात सोन्यात गुंतवणूक चांगली मानली जाते. साधारणपणे, बहुतेक जण सोन्यात गुंतवणूक करणे हा सुरक्षित पर्याय मानतात.
2 / 9
देशातील तरुण गुंतवणूकदारांच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशातील सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. आता भौतिक सोन्यामध्ये म्हणजे दागिन्यांमध्येच नव्हे तर वेगवेगळ्या मार्गांनी गुंतवणूक करत आहेत.
3 / 9
सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे प्रत्यक्ष सोने खरेदी करणे. यामध्ये सोन्याव्यतिरिक्त तुम्हाला मेकिंग चार्जेस देखील द्यावे लागतील. सामान्य दागिन्यांव्यतिरिक्त, सोन्याच्या नाण्यांच्या रूपात भौतिक सोने देखील खरेदी केले जाऊ शकते.
4 / 9
सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड सेव्हिंग स्कीम हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदार ठराविक कालावधीसाठी दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवतात. यानंतर, कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला ती रक्कम काही बोनससह भौतिक सोन्यात गुंतवण्याची संधी मिळते. अनेक ज्वेलर्स ग्राहकांच्या सोयीसाठी ही योजना सुरू करतात.
5 / 9
गोल्ड ईटीएफ हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग आहे. सोन्यात गुंतवणूक करणारे अनेक म्युच्युअल फंड आहेत. अशाप्रकारे, या गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला प्रत्यक्ष सोन्याइतकेच निश्चित परतावा मिळू शकतो. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे ट्रेंडिंग खाते असणे आवश्यक आहे.
6 / 9
सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सार्वभौम गोल्ड बाँड योजना हा एक उत्तम पर्याय आहे. रिझव्‍‌र्ह बँक वेळोवेळी SBG योजना सुरू करून गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय उपलब्ध करून देते.
7 / 9
पेटीएम, फोन पे, गुगल पे इत्यादी अनेक अॅप्स वेळोवेळी सोन्यात गुंतवणुकीचे पर्याय घेऊन येत असतात. अशा अॅप्सद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याला डिजिटल गोल्ड असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सोन्याप्रमाणे कधीही सोने खरेदी आणि विक्री करू शकता.
8 / 9
बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतीची कालच्या किमतीशी तुलना केली तर आज तो २५० ते ३०० रुपये प्रति १० ग्रॅम घसरला आहे.
9 / 9
देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा भाव ५९,५०० रुपयांच्या आसपास आहे. एक किलो चांदीचा दर ७४,२०० रुपये आहे. चांदीच्या दरात ६०० रुपयांची घसरण झाली आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी