शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ Adani ग्रुपच नाही, तर ३६ कंपन्यांमध्ये लागलाय LIC चा पैसा; ६ महिन्यांत ५८ टक्क्यांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 1:54 PM

1 / 9
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) अदानी समूहात गुंतवणूक आहे. परंतु यातून होणाऱ्या नफ्यात थोडी घट झाली आहे. रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सतत्यानं घसरण होत आहे. त्यामुळे एलआयसीलाही फटका बसत आहे.
2 / 9
LIC ही केवळ भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी नाही तर भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार देखील आहे. हिंडेनबर्गचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण होत आहे.
3 / 9
गेल्या काही दिवसांत एलआयसीच्या शेअर्सचे मूल्यांकन निम्म्यावर आले आहे. पण केवळ अदानी समूहामुळेच एलआयसीला तोटा होत आहे असे नाही. उलट अशा एकूण 36 कंपन्या आहेत.
4 / 9
या प्रकरणावरून आता राजकारणही तापू लागलं आहे. याचे पडसाद संसदेतही पाहायला मिळाले आहेत. अदानी समूहात गुंतवणूक करण्याच्या एलआयसीच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाचे खासदार करत आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अदानी ग्रुप ही एकमेव कंपनी नाही जिथून एलआयसीचा नफा कमी झाला आहे. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यात गेल्या सहा महिन्यांत एलआयसीच्या गुंतवणुकीवरील नफा कमी झाला आहे.
5 / 9
अशा 36 कंपन्या आहेत ज्यात LIC ची गुंतवणूक आहे आणि ज्यांच्या शेअर्सची किंमत गेल्या सहा महिन्यांत 20 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. तथापि, शेअरच्या किमतींची अस्थिरता बाह्य घटकांवर देखील अवलंबून असू शकते. परंतु बाजार विश्लेषकांचे असे मत आहे की एलआयसीच्या गुंतवणुकीला या अल्प कालावधीसाठी जज केले जाऊ नये. कारण एलआयसी दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून अनेक नामांकित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहे.
6 / 9
दरम्यान, 'Ace Equity' कडील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, LIC चे अदानी समूहातील कंपन्यांसह इतर अनेक कंपन्यांचे शेअर मूल्य गेल्या सहा महिन्यांत 58 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. यामध्ये फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स, पिरामल एंटरप्रायजेस, ओमॅक्स, इंडस टॉवर्स, लॉरस लॅब्स, जेट एअरवेज (इंडिया), सनटेक रियल्टी, बॉम्बे डाईंग, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर, अरबिंदो फार्मा आणि जेपी इन्फ्राटेक यांचा समावेश आहे.
7 / 9
एलआयसीने अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स आणि इकॉनॉमिक झोन आणि अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कामगिरीवर नजर टाकली, तर अदानी समूहाच्या या सर्व कंपन्या एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक तोट्यात आहेत. एलआयसीकडे अदानी पोर्ट्समध्ये 9.14 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.96 टक्के, अदानी एंटरप्रायझेसमध्ये 4.23 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 3.65 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 1.28 टक्के हिस्सा आहे.
8 / 9
LIC च्या 10 सर्वात मोठ्या होल्डिंग्स IDBI (49.24 टक्के), LIC हाउसिंग फायनान्स (45.24 टक्के), स्टँडर्ड बॅटरीज (19.99 टक्के), मॉडेला वूलन्स (17.31 टक्के), ITC (15.29 टक्के), NMDC (13.67 टक्के). टक्के), महानगर टेलिफोन निगम (13.25 टक्के), ग्लोस्टर (12.85 टक्के), लार्सन अँड टुब्रो (12.50 टक्के) आणि सिम्प्लेक्स रियल्टी (12.38 टक्के) सारख्या कंपन्यांमध्ये आहे. परंतु या 10 पैकी 7 कंपन्यांच्या शेअरमध्ये या कालावधीत वाढ झाली आहे.
9 / 9
LIC ने अदानी ग्रुपच्या या चार शेअर्समध्ये सुमारे 23,840 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी बाजारातील किमतींवर आधारित, या गुंतवणुकीचे मूल्य 27,200 कोटी रुपये होते. तथापि, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एंटरप्रायझेस वगळता, एलआयसी अजूनही उर्वरित 2 कंपन्यांच्या शेअर्सवर नफा कमवत आहे, जरी त्यांचा नफा बुधवारच्या तुलनेत कमी झाला आहे.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीAdaniअदानीGautam Adaniगौतम अदानीshare marketशेअर बाजार