Not SBI, 'these' government banks get highest interest on FDs; See the full list
SBI नाही,'या' सरकारी बँकांमध्ये FD वर सर्वाधिक व्याज मिळते; संपूर्ण यादी पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 9:27 AM1 / 8भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अमृत कलश योजनेद्वारे आपल्या ग्राहकांना FD वर जोरदार व्याज देत आहे. मात्र, अनेक बँका एसबीआयपेक्षा जास्त व्याज देत आहेत.2 / 8अमृत कलश योजनेअंतर्गत, बँक सामान्य ग्राहकांना 7.10 टक्के व्याजदर आणि 400 दिवसांच्या FD योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर देत आहे.3 / 8तुम्हाला माहित आहे का की इतर अनेक सरकारी बँका आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना SBI पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. 4 / 8बँक ऑफ इंडिया 400 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देत आहे.5 / 8बँक ऑफ बडोदा 2 ते 3 वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.6 / 8पंजाब नॅशनल बँक 444 दिवसांच्या विशेष FD योजनेवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.25 टक्के व्याजदर आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना FD वर 7.75 टक्के व्याजदर देत आहे.7 / 8पंजाब सिंध बँक 444 दिवसांच्या कालावधीत सामान्य ग्राहकांना 7.40 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.90 टक्के व्याजदर देत आहे.8 / 8सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक कॅनरा बँक 444 दिवसांच्या FD योजनेवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications