not tata or reliance 153 itc employees receive salary more than rs 1 crore in fy 21
TATA, Reliance आता विसरा; ‘या’ कंपनीतील १५३ कर्मचारी घेतात १ कोटी पगार! By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 4:26 PM1 / 10एकीकडे कोरोना संकटामुळे अनेक व्यापार, उद्योग, व्यवसाय बंद झाले आहेत. लॉकडाऊनमुळे बेरोजगारीच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 2 / 10तर, दुसरीकडे काही क्षेत्रातील कंपन्या याच कोरोना कालावधीत मालामाल झाल्या आहेत. आतापर्यंत कधीच झाला नाही, एवढा मोठा नफा कोरोना संकटाच्या काळात कंपन्यांना झाला आहे. 3 / 10यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांनाही उत्तम सुविधा, पगारवाढ देत असून, काही कंपन्यांनी वर्षभरात दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट जाहीर केले आहे. 4 / 10TATA आणि Reliance नाही, तर देशातील सर्वाधिक पगार देणारी कंपनी कोणती आहे, याबाबत तुम्हाला अधिक माहिती असेल, असे नाही. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे टर्नओव्हरच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीत ही कंपनी सर्वांत कमी खर्च करते. पाहा, डिटेल्स...5 / 10एका रिपोर्टनुसार, TATA आणि Reliance नाही, तर आपल्या कर्मचाऱ्यांना कोट्यवधीचा पगार देण्यात ITC सर्वांत पुढे आहे. कंपनीचे १५३ कर्मचारी असे आहेत, ज्यांचा पगार वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.6 / 10गतवर्षी ITC ने ३९ मॅनेजर्सना नोकरी दिली. त्यांचा पगार १ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. सुरुवातीला अशी कामगिरी करणारी कंपनी म्हणून HUL ची ओळख होती. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या करोडपती क्लबमध्ये १२३ कर्मचारी होते. 7 / 10यासंदर्भातील अहवालात एक आश्चर्यजनक खुलासा करण्यात आला असून, टर्नओव्हरच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीत ITC आपल्या उद्योगात सर्वांत कमी आहे. 8 / 10कंपनी आपल्या टर्नओव्हरच्या तुलनेत फक्त ४.२ टक्के कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करते. मात्र, करोडपती क्लबमध्ये सर्वात पुढे आहे. ITC चा उद्योग FMCG सह सिगरेट, पॅकेज फूड्स, पर्सनल केअर, स्टेशनरी, अगरबत्तीचा आहे. 9 / 10यासह ITC कंपनी देशातील दुसरी सर्वांत मोठी हॉटेल चेनही पाहते. कृषी आणि पेपरबोर्ड मार्केटमध्ये ITC देशातील सर्वांत मोठी खासगी कंपनी आहे. त्यामुळे विविध उद्योगातील मॅनेजर्सची संख्या जास्त आहे.10 / 10HUL देशातील एक मोठी एफएमसीजी कंपनी आहे. आपल्या देशात या कंपनीला CEO Factory म्हटले जाते. विविध अभ्यासांचा दावा आहे की, या कंपनीत कामाची सुरुवात करणारे जवळपास 400 कर्मचारी विविध कंपन्यांमध्ये CEO बनवले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications