शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता विनाअनुदानित सिलेंडरवरही मिळवा सवलत; जाणून घ्या बुकिंगची 'ही' पद्धत

By कुणाल गवाणकर | Published: November 18, 2020 10:49 PM

1 / 10
एलपीजी गॅस सिलेंडरच्या वापरकर्त्यांसाठी एक कामाची बातमी आहे. एलपीजी सिलेंडरचा वापर करणारे ग्राहक आता विनाअनुदानित सिलेंडरवरही मोठी सवलत मिळवू शकतात.
2 / 10
एलपीजी सिलेंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी मोदी सरकारनं आधीच उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्राहकांना मिळणारी सवलत थेट बँक खात्यात जमा होते.
3 / 10
उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ग्राहकांना वर्षाकाठी १२ सिलेंडर मिळतात. या सिलेंडरवर ग्राहकांना अनुदान मिळतं.
4 / 10
१२ च्या पुढे सिलेंडर वापरल्यास त्या सिलेंडरच्या रकमेवर अनुदान मिळत नाही. मात्र आता विनाअनुदानित सिलेंडरवरदेखील अनुदान मिळू शकतं.
5 / 10
मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी तेल कंपन्या ग्राहकांना कॅशबॅकची सुविधा देत आहेत.
6 / 10
तुम्ही सिलेंडरची रक्कम डिजिटल माध्यमाचा वापर करून भरल्यास तुम्हाला कॅशबॅकची सुविधा मिळेल.
7 / 10
हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम आपल्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट केल्यावर सूट देत आहेत.
8 / 10
सवलतीचा लाभ घ्यायचा असल्यास सिलेंडर बुक करताना रोख रकमेऐवजी ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडा.
9 / 10
Paytm, Phonepe, Google Pay, UPI आणि Mobikwik सारख्या पर्यायांचा वापर करून सिलेंडर बुक केल्यास सवलत मिळू शकते.
10 / 10
पहिल्यांदा ऑनलाईन पेमेंट करताना तेल कंपन्या मोठी सवलत देतात. Paytm आपल्या ग्राहकांना ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देतं.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरPaytmपे-टीएमgoogle payगुगल पे