now bsnl rs 2399 annual prepaid plan gives 455 days validity and compare with jio vi and airtel
याला म्हणतात प्लान! दररोज केवळ ६ रुपयांत मिळवा १.२५ वर्षांची वैधता, भरघोस डेटा आणि... By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:43 PM1 / 12आताच्या घडीला टेलिकॉम क्षेत्रात तीव्र स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. विविध कंपन्या आपल्या युझर्ससाठी अनेकविध प्लान सादर करत असतात.2 / 12सरकारच्या मालकीची टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या युझर्ससाठी एकापेक्षा एक उत्तम प्लान आणत आहे. आता कंपनीने आपल्या यूजर्सला सव्वा वर्ष मोफत कॉल आणि इंटरनेटची सुविधा देत आहे. 3 / 12या प्लानमध्ये BSNL यूझर्सला दररोज केवळ ५.२७ रुपये खर्च करावे लागतील. BSNL ने वार्षिक प्रीपेड प्लानची वैधता वाढवली आहे. यामुळे आता कंपनीच्या वार्षिक प्लानची किंमत २,३९९ रुपये आहे. आता कंपनीने या प्लानला ९० दिवसांपर्यंत वाढवले आहे.4 / 12BSNL च्या या प्लानमध्ये वाढ केवळ प्रमोशन पीरियडपर्यंत करण्यात आली आहे, ज्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२१ आहे. आता BSNL च्या २,३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ४५५ दिवसांची वैधता मिळेल.5 / 12BSNL च्या २,३९९ रुपयांच्या वार्षिक प्लानमध्ये यूजर्सला दररोज ३ जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. यात लोकल आणि एसटीडीसह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची देखील सुविधा मिळते. 6 / 12या व्यतिरिक्त MTNL च्या मुंबई आणि दिल्ली भागात अनलिमिटेड साँग चेंज पर्यायासोबत PRBT, फ्री EROS नाउ इंटरनेटमेंट सर्व्हिस देखील मिळेल.7 / 12BSNL सह जिओचा २,३९९ रुपयांचा प्लान असून, या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळत आहे. ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच, दररोज १०० एसएमएस या प्लानमध्ये मिळतात. Jio अॅप्सचे मोफत स्बस्क्रिप्शन देखील मिळेल.8 / 12JIO चा दुसरा एक २,५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान असून, यामध्ये दररोज २ जीबी डेटा, अनिलमिटेड लोकल, एसटीडी कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. या प्लानचा कालावधी देखील ३६५ दिवस आहे. यात Disney+ Hotstar VIP चे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल.9 / 12Airtel चा २,४९८ रुपयांचा प्रीपेड प्लान असून, या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एमएमएसची सुविधा मिळते. यासह २,६९८ रुपयांचा असून, या प्लानची वैधता देखील ३६५ दिवस आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये यात Disney+ Hotstar VIP चे एक वर्षासाठीचे स्बस्क्रिप्शन मोफत मिळेल.10 / 12या प्रकारात Vodafone Idea म्हणजेच Vi चा २,३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान असून, या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉल व दररोज १०० SMS मिळतात. ३६५ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट्स मिळतील.11 / 12Vi चा आणखी एक २,५९५ रुपयांचा प्रीपेड प्लान असून, या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा, अनिलमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगसह दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.12 / 12Vi च्या या प्लानमध्ये ३६५ दिवस वैधतेसह बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट्स मिळतील. स्ट्रिमिंग बेनिफिट्समध्ये यात प्रीमियम Zee5 सब्सक्रिप्शन व Vi Movies अँड TV चा अॅक्सेस मिळतो. आणखी वाचा Subscribe to Notifications