शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold : सरकारनं घेतला निर्णय; आता 'या' तारखेपासून Hallmarking होणार अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:47 PM

1 / 11
काही दिवसांपूर्वी सरकारनं १ जूनपासून देशात हॉलमार्किंग (Hallmarking) अनिवार्य करण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता हॉलमार्किंगसाठी तारीख बदलण्यात आली आहे.
2 / 11
आता १५ जूनपासून सोन्यावर हॉलमार्किंग करणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच अर्थ १५ जूनपासून सर्व ज्वेलर्स हॉलमार्किंग असलेलंच सोनं विकू शकतील.
3 / 11
यापूर्वी हा नियम १ जूनपासून लागू करण्यात येणार होता. परंतु देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Second wave of corona) हाहाकार माजला आहे. या पार्श्वभूमीवर हा नियम लागू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
4 / 11
यापूर्वी सोन्याच्या व्यापाराशी निगडीत असलेल्या लोकांनी सरकारला हॉलमार्किंग लागू करण्याची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
5 / 11
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं त्यांची मागणी मान्य केली आहे. तसंच यासाठी नवी व्यवस्था तयार करण्यासही व्यापाऱ्यांना वेळ मिळणार आहे.
6 / 11
१५ जूनपासून दागिन्यांची विक्री करण्याच्या नव्या व्यवस्थेसाठी एक समिती स्थापन करणयात आली होती. ही समिती हॉलमार्किंगशी निगडीत समस्यांचं निराकरण करणार आहे.
7 / 11
ग्राहकांना वेळ न दवडता हॉलमार्क प्रमाणित सोन्याचीच विक्री केली पाहिजे, असं मत रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी व्यक्त केलं. याशिवाय त्यांनी सोन्याच्या विक्रीच्या नव्या व्यवस्थेशी निगडीत तयारींचीही माहिती घेतली.
8 / 11
देशात हॉलमार्किंग लागू करण्याची तारीख यापूर्वीही बदलण्यात आली होती. ही यापूर्वी जानेवारी महिन्यात लागू करण्यात येणार होती. परंतु त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती.
9 / 11
यानंतर पुन्हा एकदा आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता १५ तारखेला हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे. यावेळी देशात वाढत असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
10 / 11
हॉलमार्किंग ग्राहकांसाठी फायद्याचं आहे. जर तुम्ही हॉलमार्क असलेलं सोनं खरेदी केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची डेप्रिसिएशन कॉस्ट (depreciation cost) लागत नाही. याचाच अर्थ तुम्हाला सोन्याची पूर्ण किंमत परत मिळते.
11 / 11
याशिवाय तुम्ही जे सोनं खरेदी कराल त्याच्या गुणवत्तेची (Quality) हमी दिली जाईल. तसंच यामुळे देशात भेसळयुक्त सोन्याच्या विक्रीस प्रतिबंध होईल. यामुळे ग्राहकांची फसवणूकही होण्याची शक्यता नाही.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीbusinessव्यवसायpiyush goyalपीयुष गोयल