शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

India Post : भारीच! आता पोस्टाकडूनही मिळणार Amazon-Flipkart सारख्या सुविधा; करा ऑनलाईन खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 2:28 PM

1 / 8
तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता इंडिया पोस्टच्या माध्यमातून Amazon आणि Flipkart सारख्या सुविधा घेता येणार आहेत. कारण आता इंडिया पोस्टनेही आपलं ई-कॉमर्स पोर्टल सुरू केलं आहे. इंडिया पोस्टच्या या नव्या सुरुवातीमुळे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट्सनाही मोठा झटका बसू शकतो.
2 / 8
इंडिया पोस्टचं विश्वसनीय आणि सर्वांत मोठं नेटवर्क भारतभर अनेक वर्षांपासून पसरलेलं आहे. या नव्या सुरुवातीमुळे आता पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, कारण आता इंडिया पोस्ट आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणं होम डिलिव्हरी करणार आहे.
3 / 8
ग्राहकांना यामुळे घरबसल्या इंडिया पोस्टच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. इंडिया पोस्टच्या नव्या सुरुवातीमुळे आता वस्तूंची डिलिव्हरी थेट लोकांच्या घरापर्यंत करता येणार आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट्सप्रमाणे, इंडिया पोस्ट देखील ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे लोकांच्या घरापर्यंत वस्तूंची थेट डिलिव्हरी करेल आणि सामान्य लोकांना इतर सुविधा देखील देईल.
4 / 8
अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या मोठ्या ई-कॉमर्स जिथे पोहोचल्या नसतील तिथे इंडिया पोस्टचं ई-कॉमर्स पोहोचेल. इंडिया पोस्टचं देशभरात खूप मोठं नेटवर्क आहे आणि ते भारतातील प्रत्येक ग्रामीण भागात पोहोचलं आहे. या कारणास्तव, इंडिया पोस्टच्या ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे खरेदी केलेला माल पोस्टमनद्वारे भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील, ग्रामीण भागातील कोणत्याही नागरिकांपर्यंत पोहोचवला जाईल.
5 / 8
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतातील पोस्ट ऑफिसची पोहोच ग्रामीण भागापर्यंत आहे आणि त्यांची संख्या 1.55 लाखांपेक्षा जास्त आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणे इंडिया पोस्ट देखील ग्राहक आणि खरेदीदारांना त्यांच्यासोबत काम करण्याची आणि खरेदी करण्याची संधी देत ​​आहे.
6 / 8
सर्वप्रथम तुम्हाला इंडिया पोस्ट Ecom.Indiapost.Gov.In च्या अधिकृत ई-कॉमर्स वेबसाइटवर जावं लागेल. यानंतर तुम्हाला होम पेजवर माय अकाउंट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. - त्यानंतर तुम्हाला Existing User आणि New User असे दोन प्रकारचे पर्याय दिसतील ?आता Register Now हा पर्याय निवडावा लागेल आणि नोंदणी पूर्ण करावी लागेल.
7 / 8
तुमची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचा पत्ता, पिन कोड, राज्य, मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती सेव्ह करावी लागेल, ज्यातून तुम्हाला नवीन यूजर आयडी पासवर्ड मिळेल. इंडिया पोस्टच्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून कपडे, भारतीय पोस्ट उत्पादने, बांगड्या, भेटवस्तू, घरगुती उपकरणे, बास्केट या गोष्टींची खरेदी करता येईल.
8 / 8
टपाल विभाग सध्या स्पीड पोस्ट, पोस्टल लाइफ इन्शुरन्स, लॉजिस्टिक पोस्ट, रिटेल पोस्ट, बिझनेस पार्सल, पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर, सुकन्या समृद्धी योजना, बिझनेस पोस्ट पार्सल, आयएमओ (IMO), ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स, एक्सप्रेस पार्सल या सेवा देत आहे.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसShoppingखरेदी