now just pay 20 rupees and get unlimited calling data from vi reliance jio airtel and bsnl
मस्तच! आता केवळ २० रुपयांत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग, भरघोस डेटा आणि.... By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 9:04 PM1 / 10भारतात टेलिकॉम बाजारात तीव्र स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवे प्लान सादर करत आहेत. (mobile prepaid recharge plans)2 / 10रिलायन्स जिओने जेव्हापासून टेलिकॉम मार्केटमध्ये पाऊल ठेवले आहे. तेव्हापासून ही स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. रिलायन्स जिओ, Airtel, Vi आणि बीएसएनएल यांसारख्या कंपन्या स्वस्त प्लान आणत आहेत. 3 / 10Jio, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि BSNL या कंपनीने काही प्लान्स उपलब्ध केले आहेत. ज्यात डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. याची किंमत २० रुपयांपेक्षा कमी आहे. 4 / 10या प्लान्समध्ये डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएलचा समावेश आहे.5 / 10Vi चा १९ रुपयांचा सर्वांत स्वस्त प्लान आहे. याची वैधता २ दिवसांची आहे. यात युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. युझर्संना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये २०० एमबी डेटा दिला जातो. 6 / 10Airtel चाही १९ रुपयांचा सर्वांत स्वस्त प्लान आहे. याचीही वैधता २ दिवसांची आहे. यात युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. युझर्संना कोणत्याही नटेवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येऊ शकते. या प्लानमध्ये २०० एमबी डेटा दिला जातो.7 / 10BSNL चा १८ रुपयांचा सर्वांत स्वस्त प्लान आहे. यामध्ये युझर्सना १ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २ दिवसांची आहे. तसेच युजर्संना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये १०० एसएमएस दिले जाते.8 / 10Jio चा ११ रुपयांचा सर्वांत स्वस्त प्लान असून, याची वैधता प्लानवर अवलंबून आहे. यात युजर्संना १ जीबी डेटा दिला जाते. 9 / 10टेलिकॉम क्षेत्रातील चार आघाडीच्या कंपन्यांकडून केवळ काही रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, भरघोस डेटा ऑफर केला जात आहे. याची वैधता कमी असली, तरी आपत्कालीन परिस्थितीत हे प्लान उपयुक्त ठरू शकतात, असे सांगितले जाते. 10 / 10ब्रॉडबँडमध्येही हळूहळू मोठ्या स्पर्धेला सुरुवात झाली असून, Airtel आणि BSNL कंपन्या कमी दरात उपयुक्त प्लान सादर करत आहेत, याचाही फायदा युझर्स घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications