now vodafone idea users vi customer can recharge via whatsapp payment service
मस्तच! आता Vi रिचार्ज WhatsApp वरूनही करता येणार; कसे? वाचा, डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 5:14 PM1 / 10जिओ कंपनीच्या टेलिकॉम जगतातील एन्ट्रीनंतर सर्व परिमाण आणि परिणाम बदलून गेले आहेत. स्वस्तात चांगले प्लान देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ लागल्याची पाहायला मिळत आहे. (vi recharge via whatsapp payment)2 / 10युझर्सना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या कमी किमतीचे प्लान्स आणत असून, यात व्होडाफोन आयडिया (Vi) देखील मागे नाही. Vi कडूनही युझर्सना उत्तमोत्तम प्लान्स ऑफर केले जात आहेत. 3 / 10आता मात्र, Vi ने युझर्ससाठी आनंदाची बातमी आणली आहे. आता WhatsApp Payments वरुन Vi युझर्स रिचार्ज करू शकणार आहेत. आताच्या घडीला सध्या टेलिकॉम ऑपरेटर भारतात व्हॉटसअॅप पेमेंट द्वारे सिम रिचार्ज करण्याची सुविधा देत नाही. 4 / 10WhatsApp Payments रिचार्ज सुविधा देणारी Vi पहिली कंपनी ठरली आहे. अलीकडेच कंपनीकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. आतापर्यंत त्यांच्याजवळ Vi App, Paytm आणि डिजिटल ट्रांजॅक्शंस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिचार्ज करण्याची सुविधा होती.5 / 10Vi चे प्रीपेड युजर्सं केवळ दोन क्लिकमध्ये व्हॉट्सअॅप द्वारे आपला मोबाइल नंबर रिचार्ज करू शकतील. सुविधाजनक आणि सोपी पेमेंट सर्विस अंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. 6 / 10सर्व गेटवे वर पर्सनाइलाज्ड ने WhatsApp वर VIC नावाचे Chatbot सुरू केले होते. ज्यावर लोकांची समस्या सोडवली जात होती. असे करणारे Vi पहिले टेलिकॉम नेटवर्क बनले होते. सध्या Vi भारतातील तिसरी सर्वात मोठे टेलिकॉम कंपनी आहे. 7 / 10भारतात कोट्यवधी लोक या सेवेचा वापर करतात. Vi ने आणलेल्या नवीन सुविधेमुळे कोट्यवधी युझर्सना प्रीपेड रिचार्च करणे आता एकदम सोपे झाले आहे, असे सांगितले जात आहे. 8 / 10प्रसिद्ध इंस्टेंट मेसेजिंग अॅप असलेल्या WhatsApp वरून Vi युझर्स नवीन सर्विस अंतर्गत प्रीपेड किंवा पोस्टपेड रिचार्ज करू शकणार आहेत. भारतात कोट्यवधी लोकांच्या WhatsApp मोबाइलमध्ये आहे. 9 / 10दररोज मेसेज पाठवण्यासोबत व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी WhatsApp चा वापर केला जातो. 10 / 10WhatsApp Payments मुळे पैशाची देवाण घेवाण करणे अधिकच सुविधाजनक झाले आहे. याचा पूरेपूर उपयोग Vi युझर्सना करता येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications