शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता UPI द्वारे जोडू शकता Credit Card, तीन बँकांच्या ग्राहकांना मिळणार सर्वप्रथम फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:09 AM

1 / 7
रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) नेटवर्कवर रुपे (RuPay) क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. सध्या, यूपीआय डेबिट कार्ड आणि बँक खात्यांद्वारे जोडलेले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कोणतीही व्यक्ती आपलं रुपे क्रेडिट कार्ड आपल्या युपीआय खात्याशी लिंक करू शकतं. पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकच्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येईल.
2 / 7
या नव्या सेवेचा ग्राहकांना फायदा होईल असं नॅशनल पेमेंट कॉर्प ऑफ इंडियानं एका निवेदनाद्वारे सांगितलं. त्याचा व्यापाऱ्यांनाही फायदा होईल, शिवाय रुपे क्रेडिट कार्ड व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस म्हणजे युपीआय आयडीशी जोडलेलं असेल. या प्रकारे थेट सुरक्षित आणि असुरक्षित देवाणघेवाणीला सक्षण करण्यात येईल.
3 / 7
जुलै २०२२ पर्यंत युपीआय प्लॅटफॉर्मवर ३३८ बँक्स लाईव्ह आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारात या वर्षी एप्रिल महिन्यात ९.८३ लाख कोटींवर वरून वाढ होऊन ते ऑगस्ट महिन्यात १०.७३ लाख रूपयांवर गेले आहे.
4 / 7
याप्रकारे पीओएस टर्मिनलच्या माध्यमातून क्रेडिट कार्डद्वारे खर्च केली गेलेली रक्कम एप्रिल महिन्यात २९,९९८ कोटी रूपयांवरून वाढून ऑगस्ट महिन्यात ३२,३८३ कोटी रूपये झाली आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड द्वारे केला गेलेला खर्च ऑगस्ट महिन्यात वाढून ५५,२६४ कोटी रूपये झाला आहे.
5 / 7
रिझर्व्ह बँकेनं युपीआय लाईटदेखील लाँच केलं आहे. कमी किंमतीच्या देवाणघेवाणीसाठी याचा वापर केला जाईल. ऑन डिव्हाईस वॉलेटच्या मदतीनं हे काम करणार आहे. युपीआय लाईटच्या व्यवहाराची कमाल मर्यादा २०० रूपयांची होती. डिव्हाईसवर वॉलेटवर युपीआय लाईट डिजिटल मोडची एकूण मर्यादा २००० रूपये असेल.
6 / 7
या सुविधेचा लाभ आठ बँकांच्या ग्राहकांना मिळणार आहे. कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, भारतीय स्टेट बँक (एसबीआय), युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फाइनॅन्स बँक यांचा यात समावेश आहे. याशिवाय भारत बिल पेमेंट सिस्टम अंतर्गत क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शनची सुविधाही सुरू करण्यात आलीये.
7 / 7
या सुविधेचा लाभ आठ बँकांच्या ग्राहकांना मिळणार आहे. कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, भारतीय स्टेट बँक (एसबीआय), युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फाइनॅन्स बँक यांचा यात समावेश आहे. याशिवाय भारत बिल पेमेंट सिस्टम अंतर्गत क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शनची सुविधाही सुरू करण्यात आलीये.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसाbankबँक