शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NPS चे दुहेरी फायदे, एकरकमी मिळतील 45 लाख रुपये...त्यानंतर दरमहा 45000 रुपये पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 6:39 PM

1 / 9
Open NPS Account: खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये करबचतीबाबत अनेक संभ्रम आहेत. अनेकजण मार्च महिना आल्यावर करबचतीसाठी हालचाल सुरू करतात. अशावेळी कुठे गुंतवणूक करावी, कुठे कर वाचेल, असे अनेक प्रश्न समोर असतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. पण, एका ठिकाणी यापेक्षा जास्त बचत होऊ शकते.
2 / 9
कलम 80C अंतर्गत कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट मिळते. लाइफ इन्शुरन्स प्रीमियम, डिफर्ड अॅन्युइटी, PPF, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान (ULIP) नॉन-कम्युटेबल डिफर्ड अॅन्युइटी पेमेंट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, डिबेंचर/शेअर/म्युच्युअल फंड, मुदत ठेवींमध्ये (FD) 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी केलेली गुंतवणूक, गृहकर्जाची परतफेड (केवळ मूळ रक्कम) आणि सुकन्या समृद्धी योजना 80C च्या कक्षेत येतात.
3 / 9
याशिवाय, अशी एक योजना आहे, ज्यात तुम्ही जास्त करबचत करू शकता. आम्ही नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) बद्दल बोलत आहो. कर वाचवण्यासाठी तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये जास्तीत जास्त 50,000 रुपये जमा करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 80CD (1B) अंतर्गत तुम्ही NPS मध्ये केलेल्या बचतीवर 80(C) चे अतिरिक्त कर लाभ घेऊ शकता. म्हणजेच, जर तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक केली तर 50 हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक स्वतंत्र आयकर सूटच्या कक्षेत येईल. अशा प्रकारे, तुम्ही 80C सह 2 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळवू शकता.
4 / 9
तुम्ही ताबडतोब NPS खाते उघडून तुमचा पगार कापला जाण्यापासून वाचवू शकता. इतकंच नाही तर कराव्यतिरिक्त NPS ही एक उत्तम सेवानिवृत्ती योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जानेवारी 2004 मध्ये सुरू झाली. या योजनेत पूर्वी फक्त सरकारी कर्मचारीच गुंतवणूक करू शकत होते. परंतु 2009 मध्ये ही सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुली करण्यात आली. प्रत्येकजण या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
5 / 9
आता मोठ्या प्रमाणावर खाजगी नोकरी करणारे लोकही या योजनेत सामील होत आहेत. कर सूट व्यतिरिक्त तुम्ही निवृत्तीनंतर चांगली कमाई शोधत असाल, तर तुम्ही NPS मध्ये अकाउंट उघडू शकता. हे अकाउंट तुम्ही तुमच्या नावाने किंवा तुमच्या पत्नीच्या नावानेही उघडू शकता. या योजनेत वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकरकमी रक्कम आणि मासिक पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे 60 वर्षांनंतर तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही.
6 / 9
तुमच्या उत्पन्नानुसार तुम्ही मासिक किंवा वार्षिक NPS खात्यात पैसे जमा करू शकता. तुम्ही NPS मध्ये रु. 1,000 प्रति महिना गुंतवणे सुरू करू शकता, जे तुम्ही वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत सुरू ठेवू शकता. NPS गुंतवणुकीवर 40 टक्के एन्युटी खरेदी करणे आवश्यक आहे. तर 60 वर्षांनंतर 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येते.
7 / 9
उदा- तुमचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्ही एनपीएस खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवले आणि 30 वर्षे गुंतवणूक चालू ठेवली. वयाच्या 60 वर्षापर्यंत त्या गुंतवणुकीवर 10% रिटर्न्स मिळाले, तर 60 व्या वर्षी तुमच्या खात्यात 1.12 कोटी रुपये असतील. नियमांनुसार, तुम्ही वयाची 60 वर्षे पूर्ण करताच तुम्हाला 45 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल. याशिवाय दरमहा 45 हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. 30 वर्षांत एकूण 18 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. यामध्ये 10 टक्के वार्षिक परताव्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, व्याजदर वर-खाली होऊ शकतात.
8 / 9
187 ते 65 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. तुम्ही कोणत्याही बँकेत NPS खाते उघडू शकता. मुदतीनंतर गुंतवणूकदार NPS मधून 60 टक्के पैसे काढू शकतो. म्हणजेच वयाच्या 60 वर्षांनंतर एखादी व्यक्ती एनपीएसमध्ये जमा केलेल्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम कोणत्याही कराशिवाय काढू शकतो.
9 / 9
तुम्ही घरी बसून ऑनलाइन (eNPS) खाते उघडू शकता. NPS पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) द्वारे चालवले जाते, ज्यामुळे हे खूप सुरक्षित आहे. गेल्या काही वर्षांत एनपीएस खाती मोठ्या प्रमाणावर उघडली गेली आहेत. NPS मध्ये दोन प्रकारची खाती, टियर-1 आणि टियर-2 आहेत.
टॅग्स :Investmentगुंतवणूकbusinessव्यवसायMONEYपैसा