NPS investment scheme: Want to be a billionaire till retirement? Do investment in NPS
निवृत्तीपर्यंत कोट्यधीश व्हायचंय..? अशी करा गुंतवणूक, खात्यात दर महिन्याला येतील 50,000 रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 7:21 PM1 / 7 NPS Retirement Scheme: जर तुम्हालाही तुमचे म्हातारपण आर्थिकरित्या सुरक्षित करायचे असेल, तर तुम्ही आतापासूनच नियोजन करायला हवे. जितक्या लवकर तुम्ही पैशांची बचत सुरू कराल, तितका जास्त फायदा तुम्हाला म्हातारपणी होईल. चांगली गुंतवणूक आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्यासाठी तुम्ही EPF, NPS, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट इत्यादीसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.2 / 7 NPS द्वारे निवृत्ती नियोजन- या सर्वांमध्ये NPS हा एक असा पर्याय आहे, जो सुरक्षित असण्यासोबतच उत्तम परतावा देतो. आम्ही तुम्हाला नवीन पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS द्वारे दरमहा 50,000 रुपये पेन्शनची व्यवस्था कशी करू शकता येईल, हे सांगणार आहोत.3 / 7 निवृत्तीनंतर 50,000 रुपये पेन्शन- समजा तुम्ही आता 30 वर्षांचे आहात, आज तुम्ही एनपीएसमध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली. निवृत्तीपर्यंत म्हणजेच 30 वर्षांनी तुम्ही 60 वर्षांचे व्हाल, तेव्हा तुमच्या हातात एक कोटी रुपयांहून अधिकची रक्कम असेल. यातून तुम्हाला दरमहा 52 हजार रुपये पेन्शनदेखील मिळत राहील. म्हणजेच तुम्ही म्हातारपणी कोणत्याही तणावाशिवाय आरामात जगू शकता.4 / 7 लक्षाधीश म्हणून निवृत्त व्हाल- NPS वर सरकारची हमी आहे, म्हणजेच तुम्हाला वार्षिक 9 ते 12 टक्के परतावा मिळतो. मॅच्युरिटीवर, तुम्हाला वार्षिकी योजनेत 40% गुंतवणूक करावी लागेल जेणेकरून तुम्हाला नियमित पेन्शन मिळू शकेल. वार्षिकी परतावा देखील 6% च्या जवळ आहे. आता NPS कॅल्क्युलेटरच्या मदतीने जाणून घ्या तुम्हाला 30 वर्षांनंतर किती रक्कम मिळेल. NPS कॅल्क्युलेटरनुसार, निवृत्तीनंतर तुमची एकूण संपत्ती 1.84 कोटी रुपये आहे. एकरकमी रक्कम 1.10 कोटी रु आणि पेन्शन रु 52,857 प्रति महिना मिळे.5 / 7 NPS परतावा अनेक घटकांवर अवलंबून असतो- लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे, ही सर्व गणना अंदाजे आहेत, आकडे आणि परतावा भिन्न असू शकतो. तुम्हाला तुमची मासिक पेन्शन वाढवायची किंवा कमी करायची असेल, तर तुम्हाला त्यानुसार NPS मधील गुंतवणूक वाढवावी किंवा कमी करावी लागेल. NPS मधील एकूण संपत्ती आणि पेन्शन तुमचे वय आणि इक्विटी मार्केटची कामगिरी यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. 6 / 7 18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणीही NPS मध्ये गुंतवणूक करू शकतो. NPS मध्ये कर लाभ- NPS च्या माध्यमातून तुम्ही वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. आयकराच्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता, परंतु तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक केल्यास 50,000 रुपयांची अतिरिक्त कर सूट आहे.7 / 7 NPS चे दोन प्रकार आहेत- NPS चे दोन प्रकार आहेत, NPS टियर 1 आणि NPS टियर 2. टियर-1 मध्ये किमान गुंतवणूक 500 रुपये आहे तर टियर-2 मध्ये ती 1000 रुपये आहे. गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. NPS मध्ये गुंतवणुकीचे तीन पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकदाराला त्याचे पैसे कुठे गुंतवले जातील हे निवडायचे आहे. इक्विटी, कॉर्पोरेट कर्ज आणि सरकारी रोखे. इक्विटीच्या अधिक एक्सपोजरसह ते उच्च परतावा देतात. तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी बोलल्यानंतरच तुम्ही गुंतवणूक करावी. आणखी वाचा Subscribe to Notifications