शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ एप्रिलपासून NPS ते क्रेडिट कार्डचे नियम बदलणार; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 12:55 PM

1 / 7
सरकार आर्थिक बाबतीत दर महिन्याला वेगवेगळे बदल करत असतं, नियमातही बदल करत असतं. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होतो. आता मार्च महिना काहीच दिवसात संपणार आहे. यासह हे आर्थिक वर्षही संपणार आहे. आता एक एप्रिल पासून नॅशनल पेंशन सिस्टीममध्ये बदल होणार आहेत.
2 / 7
नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये लॉग इन करण्याच्या पद्धतीतील बदल आणि SBI च्या क्रेडिट कार्ड नियमांमधील बदलांचा समावेश आहे. याचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. NPS खात्यात लॉग इन करण्यासाठी, दोन घटक पडताळणी करावी लागणार आहे.
3 / 7
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने NPS सदस्यांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या लॉगिन प्रणालीमध्ये बदल केले आहेत. आता एनपीएस खात्यात लॉग इन करण्यासाठी, एनपीएस खातेधारकांना वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तसेच आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर आवश्यक असेल. PFRDA NPS मध्ये आधार-आधारित लॉगिन प्रमाणीकरण सुरू करणार आहे. हा नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे.
4 / 7
एसबीआय कार्डमध्येही मोठे बदल झाले आहेत. १ एप्रिलपासून भाडे भरल्यावर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स बंद होणार आहेत. यामध्ये SBI च्या AURUM, SBI Card Elite, SBI Card Pulse, SBI Card Elite Advantage आणि SimplyCLICK क्रेडिट कार्ड्समध्ये ही सुविधा बंद करण्यात येत आहे.
5 / 7
येस बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांना नवीन आर्थिक वर्षात भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना चालू आर्थिक वर्षाच्या एका तिमाहीत किमान १०,००० रुपये खर्च करून देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये मोफत प्रवेश मिळेल. नवीन नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहेत.
6 / 7
ICICI बँक आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल करणार आहे. १ एप्रिल २०२४ पासून, ग्राहकांनी एका तिमाहीत ३५,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास त्यांना एअरपोर्ट लाउंजमध्ये मोफत प्रवेश मिळेल.
7 / 7
OLA मनी १ एप्रिल २०२४ पासून त्याचे वॉलेट नियम बदलणार आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून कळवले आहे की ते स्मॉल पीपीआय वॉलेट सेवेची मर्यादा १०,००० रुपयांपर्यंत वाढवणार आहे.
टॅग्स :SBIएसबीआय