शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NPS Vatsalya: दर महिन्याला ₹१००० गुंतवा, मुलांच्या रिटायरमेंटला मिळतील ₹३.८ कोटी; दीड लाखांचं पेन्शनही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 10:23 AM

1 / 7
NPS Vatsalya Scheme : मोदी सरकारनं एनपीएस वात्सल्य योजनेचे सुरूवात केली आहे. याअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. नियमित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा हा विस्तार आहे. ही योजना मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. मूल १८ वर्षांचे झाल्यावर पालक या योजनेतून बाहेर पडू शकतात.
2 / 7
त्यानंतर अट अशी आहे की, मॅच्युरिटीवरील एकूण रकमेच्या किमान ८० टक्के रक्कम अॅन्युइटी प्लॅनमध्ये पुन्हा गुंतवावी लागेल आणि तुम्ही फक्त २० टक्के रक्कम काढू शकता.
3 / 7
एनपीएस वात्सल्य योजनेचा लाभ मुलाच्या उच्च शिक्षणात, व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही मोठ्या गरजेतही मिळणार आहे. तुम्हाला वर्षाला किमान १००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
4 / 7
जर तुम्ही मुलांसाठी एनपीएस वात्सल्यमध्ये थोडीशी रक्कमही गुंतवत राहिलात तर मुल १८ वर्षांचं होईपर्यंत तुम्ही मोठा फंड तयार करू शकता. तुम्ही यामध्ये १००० रुपयांपासूही सुरुवात करू शकता.
5 / 7
The blaze was detected in a ground-plus-one-storey home in Lokhandwala complex, said the officials and added that the fire was first notified around 9 am.
6 / 7
समजा वयाच्या १९ ते ६० व्या वर्षापर्यंत मूलांनी त्यात दरमहा १००० रुपये गुंतवते. अशा प्रकारे एकूण ६० वर्षांच्या कालावधीत एनपीएस वात्सल्य योजनेत ७.२० लाख रुपयांची गुंतवणूक होईल. तर तुम्हाला जवळपास ३.७६ कोटी रुपयांचं व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे तुमचा एकूण कॉर्पस ३.८३ कोटी रुपये होईल.
7 / 7
समजा वयाच्या ६० व्या वर्षांनंतर तुमच्या मुलांनी एनपीएस वात्सल्य खात्यातील सर्व पैसे अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवून पेन्शन घेतलं असं समजू. त्या प्लॅनमधील व्याजदर फक्त ५-६ टक्के असला तरी तुमच्या मुलांना वर्षाला फक्त १९.१५-२२.९८ लाख रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच दरमहा १.५९-१.९१ लाख रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहेत.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकGovernmentसरकार