शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दानशूर व्यक्तींच्या यादीत पहिला क्रमांक; रोज साडेपाच कोटींचं दान, पाहा काय करतात शिव नाडर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 8:57 AM

1 / 8
हुरून इंडिया (Hurun India) आणि एडेलगिवनं (Edelgive) एडलगिव हुरुन इंडिया फिलांथ्रोफी लिस्ट २०२३ (EdelGive Hurun India Philanthropy List 2023) जारी केली आहे. या यादीत एचसीएलचे संस्थापक शिव नाडर पहिल्या क्रमांकावर आहेत.
2 / 8
हुरुन लिस्टनुसार, शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये दररोज सरासरी ५.६ कोटी रुपये दान केले. अशाप्रकारे एका वर्षात त्यांनी एकूण २०४३ कोटी रुपये धर्मादाय कामांवर खर्च केले. २०२२ च्या आर्थिक वर्षातही ते भारतात सर्वाधिक देणगी देणारे व्यक्ती होते. हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो की रोज कोट्यवधी रुपयांचे दान देणारे शिव नाडर करतात काय? त्याच्याकडे एवढे पैसे कुठून येतात?
3 / 8
नवी दिल्लीत राहणारे शिव नाडर हे देशातील आघाडीची आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक आहेत. फोर्ब्स एशियानं जाहीर केलेल्या भारतातील १०० श्रीमंतांच्या यादीत शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याची एकूण संपत्ती २९.३ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
4 / 8
शिव नाडर यांनी १९७६ मध्ये एचसीएल ग्रुपची स्थापना केली. ही भारतातील पहिली कंपनी आहे जिने प्रथम स्वदेशी कम्पुटर तयार केले. शिव नाडर यांनी ४ दशकांहून अधिक काळ एचसीएलचं नेतृत्व केलं. आता कंपनीची धुरा त्यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा यांच्या हाती आहे.
5 / 8
शिव नाडर यांनी एचसीएलच्या माध्यमातून भरपूर पैसे कमावले आहेत. शिव नाडर यांच्या कुटुंबाची एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये ६० टक्के भागीदारी आहे. हा त्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. व्यवसायानं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या शिव नाडर यांनी १९६७ मध्ये वालचंद ग्रुपमध्ये नोकरीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली.
6 / 8
एचसीएलच्या आधी त्यांनी मायक्रोकॉम्प नावाची कंपनी स्थापन केली जी कॅल्क्युलेटर बनवते. १९७६ मध्ये त्यांनी २ लाख रुपये गुंतवून एचसीएल टेक्नॉलॉजीची स्थापना केली. १९८० मध्ये, कंपनीनं आंतरराष्ट्रीय बाजारात आयटी हार्डवेअर विकण्यास सुरुवात केली.
7 / 8
शिव नाडर यांनी १९९४ मध्ये शिव नाडर फाउंडेशनची सुरुवात केली. १९९६ मध्ये त्यांनी चेन्नई येथे एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नावाचं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं. आपल्या देणग्यांचा बहुतांश भाग ते शिक्षणाच्या प्रचारात गुंतवतात.
8 / 8
हुरुनच्या २०२२ च्या यादीत शिव नाडर हे भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले होते. त्यांनी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ११६१ कोटी रुपयांची देणगी दिली. त्याचवेळी, २०२३ या आर्थिक वर्षात शिव नाडर यांनी २०४३ कोटी रुपये धर्मादाय कामांमध्ये गुंतवले.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी