Nuvoco Vistas shares listing debut at a 17 percent discount to the issue price of Rs 570
Nuvoco Vistas Listing: नुवोको विस्तासची कमकुवत सुरूवात; नफ्यापासून गुंतवणूकदार दूरच By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:24 PM1 / 15Nuvoco Vistas Listing: CarTrade Tech च्या कमकुवत लिस्टिंगनंतर २३ ऑगस्ट रोजी Nuvoco Vistas Corporation च्या लिस्टिंगनंदेखील गुंतवणूकदारांची निराशा केली. या कंपनीचे शेअर्स इश्यू प्राईजच्या तुलनेत तब्बल १७ टक्के डिस्काऊंटवर लिस्ट झाले.2 / 15५७० रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स १७.३७ टक्के डिस्काऊंटवर म्हणजे BSE वर ४७१ रुपये आणि NSE वर ४८५ रुपये म्हणजेच १४.९१ टक्के डिस्काऊंटवर लिस्ट झाले. 3 / 15परंतु यानंतर शेअर्सच्या किंमतीत थोडी वाढ झाल्याची दिसली आणि व्यापार सुरू झाल्यानंतर पुढील १५ मिनिटांच्या आत, तो NSE वर ५४६ रुपये आणि BSE वर ५४७.१५ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर तो ५३६ रूपयांपर्यंत खाली आला होता. 4 / 15Nuvoco Vistas च्या आयपीओला १.७१ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. या आयपीओसाठी ५६०-५७० रूपयांचं प्राईस बँड ठरवण्यात आलं होतं. तसंत ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान हा आयपीओ खुला होता.5 / 15नुवाको विस्तास क्षमतेच्या बाबतीत देशातील पाचव्या क्रमांकाची आणि भारताच्या पूर्व भागातील सर्वात मओठी सिमेंट कंपनी आहे. 6 / 15या कंपनीचे ११ सिमेंट प्लान्ट्स आहेत. त्यापैकी पाच इंटिग्रेटेड युनिट्स, पाच ग्रिडिंग युनिट्स आणि एक ब्लेडिंग युनिट आहे.7 / 15देशांतर्गत प्रतिस्पर्धींबाबात सांगायचं झालं तर नुवाकोची स्पर्धा अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमें, बिर्ला कॉर्पोरेशन, दालमिया भारत सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि वंडरसारख्या कंपन्यांशी आहे.8 / 15ग्राहकांना वाहने खरेदी आणि विक्रीसाठी व्यासपीठ प्रदान करणाऱ्या कार ट्रेड टेक या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला होता.9 / 15एनएसई इंडेक्सबद्दल सांगायचं झालं तर कंपनीचे शेअर्स १५९९ रूपये प्रति शेअर्सवर लिस्ट झाले होते. परंतु याची इश्यू प्राईज १६१८ रूपये होती. बीएसई इंडेक्सवर लिस्टिंगनंतर कार ट्रेडचे शेअर्स ६ टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं होतं.10 / 15शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना कंपनीचा शेअर १५००.१० रूपयांवर बंद झाला. कंपनीच्या मार्केट कॅपिटलबद्दल सांगायचं झालं तर ती ७ हजार कोटी रूपयांपेक्षा कमी आहे. कार ट्रेड टेकच्या आयपीओला अखेरच्या दिवशी जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता. अखेरच्या दिवशी आयपीओ २०.२९ टक्के सबस्क्राईब झाला होता.11 / 15११ ऑगस्ट रोजी बंद झालेल्या तीन दिवसीय इश्यूमध्ये २६,३१,७४,८२३ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती. परंतु ऑफरसाठी केवळ १,२९,७२,५५२ शेअर्स होते.12 / 15क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स कॅटेगरीसाठी ३५.४५ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. जर अन्य बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा ४१ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या हिस्स्याला २.७५ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं.13 / 15२००९ मध्ये स्थापन झालेली कंपनी वॉरबर्ग पिनकस, तेमासके, जेपी मॉर्गन आणि मार्च कॅपिटलसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचं समर्थन आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना जुन्या गाड्यांसह नव्या कार्सची खरेदी विक्रीही उपलब्ध करून देते.14 / 15ऑनलाईन कारट्रेड टेकचा आयपीओ ९ ऑगस्ट रोजी खुला झाला होता उघडला आहे. हा आयपीओ ११ ऑगस्ट पर्यंत खुला होता. याचा प्राईज बँड १५८५-१६१८ रूपयांदरम्यान निश्चित करण्यात आला होता.15 / 15पहिल्या सत्रातही कमकुवत लिस्टिंग झाल्यानंतर या शेअरची घसरण कायम होती. शेअर बाजाराच्या अखेरच्या सत्रार हा शेअर तब्बल १५००.१० रूपये प्रति शेअर इतका खाली आला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications