nykaa market cap surpasses that of coal india britannia irctc doubles size hero motocorp
Nykaa ची गगन भरारी; मार्केट कॅप झाले कोल इंडिया, ब्रिटानिया, IRCTC पेक्षाही अधिक By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 9:23 PM1 / 9ब्युटी आणि फॅशन रिटेलर नायकाचा शेअर (Naykaa Share) बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. नायकाचं लिस्टिंगच प्रीमिअम झाल्यानं गुंतवणूकदार जबरदस्त मलामाल झाले आहे. नायकाचा शेअर लिस्ट होताच कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर देश आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत सामील झाल्या. 2 / 9स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रवेश करणारी Nykaa ची पॅरेंट कंपनी एफएसएन ई कॉमर्स व्हेन्चर्स भारतातील पहिली महिना-नेतृत्व असलेली युनिकॉक्न आहे. शेअर बाजारात आपल्या सुरूवातीच्याच ट्रेडिंगदरम्यान या कंपनीचं भांडवल ५३.५ अब्ज रुपये झालं. बुधवारी मुंबई शेअर बाजारात याचा शेअर ७८ टक्क्यांनी वर होता.3 / 9बुधवारी Nyakaa चा शेअर २००१ रूपयांवर खुला झाला आणि कामकाजाच्या अखेरच्या सत्रात २२०८ रूपयांवर बंद झाला. दोन्ही एक्सचेंजेसवर सुरूवातीच्या काही मिनिटांतच कंपनीचं मार्केट कॅप वाढून १ लाख कोटींपेक्षा अधिक झाला.4 / 9गुरूवारी सकाळीही हा शेअर २२०९.९० रूपयांवर खुला झाला आणि कामकाजाच्या अखेरच्या सत्रात हा शेअर २२३७.९५ रूपयांवर बंद झाला. दिवसभरात या शेअरमध्ये १.४६ टक्क्यांनी वाढ झाली. 5 / 9फाल्गुनी नायर हा नायकाच्या संस्थापक आहेत. नायकामध्ये फाल्गुनी यांचा निम्मा हिस्सा आहे. नायकाचा शेअर बाजारात लिस्ट होताच फाल्गुनी यांची संपत्ती ६.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यामुळे फाल्गुनी देशातील सर्वात श्रीमंत (सेल्फ मेड) महिला ठरल्या. 6 / 9ब्लुमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या आकड्यांवरून ही माहिती समोर आली. एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स नायकाची पॅरेंट कंपनी आहे. झोमॅटो आणि सोना कॉमस्टारनंतर नायका हा या वर्षातला तिसरा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे.7 / 9इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा अनुभव असलेल्या फाल्गुनी नायर यांनी २०१२ मध्ये नायकाची सुरुवात केली. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत नायकाचं अॅप ५.५८ कोटी लोकांनी डाऊनलोड केलं. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये नायकाला ६१.९ कोटी रुपयांचा नफा झाला. 8 / 9२०२० मध्ये नायकाला १६.३ कोटींचा तोटा झाला होता. नायकानं आपलं पहिलं दुकान २०१४ मध्ये सुरू केलं. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हीच संख्या ८० वर पोहोचली. सध्या देशातील ४० शहरांमध्ये नायकाची दुकानं आहेत.9 / 9इन्व्हेस्टमेंट बँकर राहिलेल्या फाल्गुनी नायर यांनी अनेक वर्षे भारतीय कंपन्यांच्या संस्थापकांना भांडवलच्या उभारणीसाठी मदत केली. त्यासाठी त्यांनी युरोप आणि अमेरिकेत रोड शो केले. आयपीओमध्ये लोकांनी गुंतवणूक करावी यासाठी अमेरिका आणि युरोपमध्ये रोड शो केले जातात. २०१२ मध्ये नायर यांनी नायकाची स्थापना केली. आज नायकाचा समावेश देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स वेबसाईट्समध्ये होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications