old cars price for sale loan state bank hdfc union bank second hand cars buyers
Old Cars on Loan : जुन्या गाड्यांवर 'या' बँका देत आहेत स्वस्त लोन; पाहा पूर्ण यादी By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 2:39 PM1 / 15अनेकांना कारचं आकर्षण असतं. अनेकदा आपण नवी कार घेण्यापूर्वी शिकण्याकरिता किंवा नवी कार आपल्या बजेटच्या बाहेर असल्यास सेकंड हँड म्हणजेच जुन्या कारचा विचार करत असतो. 2 / 15जुन्या कारवरही आपल्याला लोन घेता येतं आणि अशा काही बँका आहेत ज्या जुन्या कारवरदेखील कमी व्याजदरात लोन उपलब्ध करून देतात.3 / 15सरकारी बँकांमध्ये लोन मिलतं परंतु ते सध्याच्या ग्राहकांनाच दिलं जातं. परंतु काही खासगी बँका डिलर्सच्या मदतीनं ग्राहकांना लोन उपलब्ध करून देतात. 4 / 15सध्या कॅनरा बँक जुन्या गाड्यांवर ७.३० ते ९.९० टक्के व्याज दरानं ५ वर्षांकरिता कर्ज देते. यासाठी लोन अमाऊंटच्या ०.२५ टक्के (१ हजार ते ५ हजार) प्रोसेसिंग शुल्क म्हणून आकारले जाते.5 / 15बँक ऑफ इंडिया ७.४५ ते ८.५५ टक्क्यांनी आपल्या ग्राहकांना ३ वर्षांसाठी लोन देते. यासाठी ग्राहकांना १ टक्का प्रोसेसिंग शुल्क द्यावं लागतं. 6 / 15युनिअन बँक ऑफ इंडियादेखील जुन्या कार्ससाठी लोन देते. बँक ८.९० टक्के ते १०.५० टक्के व्याजदरानं ५ वर्षांसाठी लोन देते. यासाठी ग्राहकांकडून १ हजार रूपये प्रोसेसिंग शुल्क आकारलं जातं.7 / 15साऊथ इंडियन बँक ग्राहकांना १ टक्के प्रोसेसिंग चार्जसह १३.३० ते १३.७५ टक्के व्याजदरानं जुन्या कारसाठी कर्ज देते. 8 / 15देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना ९.५०-१०.५० टक्क्यांनी ग्राहकांना लोन देते. तसंच लोन अमाऊंटच्या ०.५० टक्के प्रोसेसिंग शुल्क आकारलं जातं. बँक हे कर्ज ५ वर्षांसाठी देते.9 / 15HDFC बँक १३.७५ ते १६ टक्के व्याज दरानं ग्राहकांना जुन्या गाड्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देते. यामध्ये १ टक्के प्रोसेसिंग शुल्क आकारलं जातं. तसंच बँक सात वर्षांच्या कालावधीसाठीही लोन देते. 10 / 15फेडरल बँक ग्राहकांना ५ वर्षांसाठी १३.८० टक्के व्याज दरानं जुन्या गाड्यांसाठी लोन देते. बँक ५ वर्षांसाठी हे लोन देत असून त्यासाठी १५०० ते २५०० रूपये प्रोसेसिंग शुल्क आकारते.11 / 15Axis Bank आपल्या ग्राहकांना जुन्या गाड्यांसाठी १४.४५ ते १६.४५ टक्के व्याजदरानं ५ वर्षांसाठी लोन उपलब्ध करून देते. तसंच यासाठी लोन अमाऊंटच्या १ टक्के प्रोसेसिंग शुल्क आकारलं जातं. 12 / 15जेव्हा आपण जुन्या कारसाठई कर्ज घेण्यासाठी जातो त्यावेळी लोन टू रेश्यो व्हॅल्यू ही महत्त्वाची असते. त्यावर तुम्हाला किती कर्ज दिलं जाईल हे अवलंबून असतं. 13 / 15यावरच तुमचा कालावधीही अवलंबून असतो. याशिवाय बँक कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देत असेल तर लोन टू रेश्यो व्हॅल्यू कमी असल्यास तुम्हाला अधिक रक्कम मिळणार नाही.14 / 15समजा तुम्हाला जुन्या कारसाठी ५ लाख रुपयांचे कर्ज हवे आहे, परंतु जर तुमची लोन रेशो व्हॅल्यू ६० टक्के असेल तर तुम्हाला फक्त ३ लाख रुपयांचे कर्ज मिळेल. 15 / 15जुन्या कार्ससाठी कर्ज देणे ही बँकांसाठी नेहमीच जोखमीचं ठरत असतं. बँका थर्ट पार्टी क्विलिटी चेकवर विश्वास ठेवत नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications