शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५०० रूपयांच्या जुन्या नोटेच्या मोबदल्यात मिळणार १० हजार रुपये; फक्त पूर्ण करावी लागेल ही अट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 7:31 PM

1 / 12
५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द होऊन काही वर्षे उलटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी ५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
2 / 12
परंतु आता हीच ५०० ची जुनी नोट तुम्हाला पैसाही कमवून देऊ शकते. यासाठी तुमच्याकडे ५०० रूपयांची कामाची नसलेली जुनी नोट असणं आवश्यक आहे. याच्या माध्यमातून तुम्ही हजारो रूपये कमवू शकता.
3 / 12
तुम्ही कदाचित विचार करत असाल की ५०० रूपयांच्या जुन्या नोटेमुळे आपल्याला कसे काय पैसे मिळतील, जेव्हा ती नोटही चलनात नाही.
4 / 12
परंतु हे सत्य आणि तुम्ही तुमच्या जुन्या नोटेच्या सहाय्यानं कोरोना काळातही घरी बसून मोठी रक्कम मिळवू शकता.
5 / 12
ज्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटांची छपाई करतं तेव्हा त्याची छपाई ही काळजीपूर्वक केली जाते. त्याचं पॅटर्न ठरलेलं आहे आणि त्याच्यानुसारच ही नोट प्रिन्ट होत असते.
6 / 12
यामुळे या सर्व नोटा दिसण्यात एकसमान असतात. परंतु रिझर्व्ह बँकेकडून सुरू असलेल्या नोटेच्या छपाईत काही चूक असेल आणि ती बाजारात आली असेल तर ती नोट खास ठरते.
7 / 12
अशा नोटा अनेक लोकं मोठी किंमत देऊन विकत घेण्यासही तयार होत असतात. तुमच्याकडे जर जुनी नोट असेल तर त्यावर एकदा चेक करा की त्याच्या सीरिअल नंबर हा दोनदा तर प्रिन्ट झाला नाही ना?
8 / 12
जर असं असेल तर तुम्हाला त्या नोटेचे ५ हजार रूपयेही मिळू शकतात.
9 / 12
जर तुमच्याकडे ५०० रूपयांची जुनी नोट असेल आणि त्याची कडा मोठी असेल, त्यावर अधिकचा पेपर असेल तर त्याच्या मोबदल्यात तुम्हाला १० हजार रूपये मिळू शकतात.
10 / 12
या नोटेची विक्री करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बेबसाईट oldindiancoins.com यावर भेट द्यावी लागेल.
11 / 12
या ठिकाणी तुमच्याकडे असलेल्या नोटेचा फोटो काढून सेलर म्हणून रजिस्टर करावं लागेस. तसंच यावर ऑन सेलचा टॅग लावावा लागेल.
12 / 12
यानंतर ज्यांना त्यात इंटरेस्ट आहे ती लोकं त्यावर बोली लावण्यास सुरूवात करतील. जो युझर सर्वाधित बोली लावेल त्याला ही नोट देऊन तुम्ही अधिक पैसे कमावू शकता.
टॅग्स :MONEYपैसाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकonlineऑनलाइन