On the auspicious occasion of Dussehra, gold rush increased; Find today's rates instantly
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याची झळाळी वाढली; फटाफट जाणून घ्या आजचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 1:39 PM1 / 9आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याकडे सोन्या-चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. सध्या इस्त्रायल आणि हमास या दोन देशातील युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 2 / 9७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि त्यापूर्वी ६ ऑक्टोबर रोजी भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट सोने ५६५३९ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. त्या दिवशी चांदीचा दर ६७०९५ रुपये प्रति किलो होता.3 / 9तेव्हापासून सोने ४१५९ रुपये प्रति १० ग्रॅमने महागून ६०६९८ रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी ४९९९ रुपयांनी वाढून ७२०९४ रुपयांवर पोहोचली आहे.4 / 9आज सोने २०० रुपये प्रति १० ग्रॅमने महागले आहे, तर चांदी प्रति किलो २०० रुपयांनी घसरली आहे आणि जुन्या दराने व्यवहार करत आहे. सणासुदीच्या काळात सोने ५७ हजार रुपयांच्या खाली तर चांदी ७६ हजार रुपयांच्या खाली आहे.5 / 9आज २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सराफा बाजारात जाहीर झालेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज मंगळवारी, २२ कॅरेट सोन्याची किंमत (गोल्ड रेट टुडे) ५६,७०० वर ट्रेंड करत आहे आणि २४ कॅरेटची किंमत ६१,८४० वर ट्रेंड करत आहे. १ किलो चांदीची किंमत ७५१०० रुपये आहे.6 / 9मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस १,९७८ डॉलर या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. 7 / 9सोन्याची ही स्पॉट किंमत २० जुलै २०२३ नंतरची सर्वोच्च पातळी आहे.यूएस मध्यवर्ती बँक फेड पुढील वर्षाच्या उत्तरार्धापासून व्याजदरात कपात करू शकते. सोन्याच्या वाढीचे हे सर्वात मोठे कारण असेल.8 / 9आधीच सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धादरम्यान इस्रायल आणि हमास यांच्यातील लष्करी संघर्षामुळे संपूर्ण जगात अनिश्चितता वाढली आहे.9 / 9 दुसरीकडे, जगभरातील केंद्रीय बँका सोने खरेदी करत आहेत. सेंट्रल बँक ऑफ चायना सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीला मोठा आधार मिळाला. आणखी वाचा Subscribe to Notifications