शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कधीकाळी बर्गरच्या दुकानात काम केलं, जगभरात नाव कमावलं; आज करतायेत कोट्यवधीची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 10:02 AM

1 / 10
आज जगात आणि भारतात बर्गरचे अनेक ब्रँड आहेत. त्यात भारतीय ब्रँड खूप कमी आहे परंतु एक असा बँड आहे ज्याने भारतासह परदेशातही नाव कमावलं आहे. हा ब्रँड आहे 'बर्गर सिंग'
2 / 10
बर्गर सिंग हे एका रेस्टॉरंटचं(Burger Singh Restaurant) नाव आहे. हे रेस्टॉरंट बनण्याची कहाणी ब्रिटनमधून सुरू झाली. मात्र सध्याच्या घडीला भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हा ब्रँड गाजत आहे.
3 / 10
ब्रिटनच्या बर्मिंघम यूनिवर्सिटीतून एमबीए करणाऱ्या कबीर जीत सिंग यांनी खूप आधीपासूनच आपल्या स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला होता. एका लष्कराच्या कुटुंबात कबीर जीत सिंगचा जन्म झाला.
4 / 10
मुलानं आपल्यासारखं लष्करात भरती होऊन देशाची सेवा करावी अशी कबीरच्या वडिलांची इच्छा होती. परंतु कबीरच्या मनात सुरुवातीपासून काहीतरी वेगळं करण्याचा विचार होता. कबीरनं त्यासाठी पदवीचं शिक्षण घेतले
5 / 10
पदवी घेतल्यानंतर कबीरने काही काळ नोकरीही केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला गेले. आज कबीर सिंग यांना बर्गर सिंग म्हणून नवी ओळख मिळाली आहे. भारतापासून ब्रिटनपर्यंत कबीर या अनोख्या नावासाठी फेमस झाले आहेत.
6 / 10
कधीकाळी बर्गर कंपनीत काम करणाऱ्या कबीर जीत सिंग यांचे जगभरात १०० हून अधिक आऊटलेट आहेत. जेव्हा कबीर सिंग कंपनीत कामाला होते, तेव्हा त्यांना पूर्ण काम केल्यानंतर एक बर्गर खायला मिळत होते. परंतु विना मसाल्याचा हा बर्गर त्यांना आवडत नव्हता.
7 / 10
त्यानंतर कबीर यांच्या डोक्यात कल्पना शिजली. त्यांनी भारतीय मसाल्यांचा वापर करून एक बर्गर बनवला. हा बर्गर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याला आणि मालकालाही खूप आवडला.
8 / 10
तिथल्या मालकाने वीकेंडला कबीरच्या बर्गर रेसिपीला तिथल्या मेन्यूमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू ब्रिटनच्या लोकांनाही कबीरनं बनवलेला बर्गर आवडू लागला. कबीर या बर्गरमुळे फेमस झाला. इंग्रजी वृत्तपत्रात कबीर सिंगला बर्गर सिंग असं नवं नाव दिले.
9 / 10
ब्रिटनमध्ये काम केल्यानंतर कबीर पुन्हा भारतात परतले. भारतातील मार्केटला समजून घेण्यासाठी त्यांनी इथेही नोकरी केली. त्यात कबीर जीत सिंग यांच्या मनात बर्गर सिंग व्यवसाय सुरू करण्याची आयडिया आली. त्यानंतर २०१४ ला कबीर यांनी बर्गर सिंग रेस्टॉरंटची सुरूवात केली.
10 / 10
सुरुवातीला ३० लाख रुपये गुंतवणूक करून कबीर यांनी गुरुग्राम इथं बर्गर सिंग उभारलं. त्यानंतर त्यांच्या उद्योगाने भरारी घेतली. आज देशातील १४ राज्यात बर्गर सिंग यांचे १०० हून अधिक शॉप उघडले आहेत. ३० लाखांपासून सुरू केलेला हा उद्योग आज जवळपास ६० कोटींपर्यंत उलाढाल करत आहेत.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी