शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकेकाळी क्लर्क म्हणून केलं काम, पोट भरण्याइतके मिळायचे पैसे; आज आहे ५७००० कोटींचा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 8:27 AM

1 / 9
देशात आणि जगात यशस्वी व्यक्तींच्या यशाची कहाणी तुम्ही यापूर्वीही ऐकली किंवा वाचली असेल. त्यांचा प्रवास अनेक तरुण उद्योजकांना पुढे जाण्याची प्रेरणा देतो. आम्ही आज तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याला त्याच्या व्यवसायात कोणतेही ज्ञान आणि अनुभव नव्हता परंतु नंतर त्यांनी त्यात हात आजमावला आणि मोठं यशही मिळवलं.
2 / 9
आम्ही सांगत आहोत हैदराबादचे उद्योगजक पीव्ही रामाप्रसाद रेड्डी यांच्याबद्दल. तुमच्यापैकी अनेकांनी त्यांच्याबद्दल ऐकलंही नसेल. पीव्ही रामप्रसाद, ज्यांना फार्मा टायकून म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्याकडे आज २१,६०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती आहे. एकेकाळी क्लर्क म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे रामप्रसाद या उच्च पदापर्यंत कसे पोहोचले, त्याची यशोगाथा आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
3 / 9
देशातील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी अरबिंदो फार्माचे संस्थापक पीव्ही रामाप्रसाद रेड्डी यांची यशोगाथा अतिशय रंजक आहे. कारण, त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायाबद्दल त्यांना त्यापूर्वी काहीच माहिती नव्हती. सामान्यत: वैद्यकीय आणि फार्मा सारख्या व्यवसायांमध्ये केवळ विज्ञानाची पार्श्वभूमी असलेले लोकच यशस्वी होतात. पण, पीव्ही रामप्रसाद यांनी हे चुकीचं असल्याचं सिद्ध केलं.
4 / 9
पीव्ही रामप्रसाद यांनी व्यंकटेश्वरा विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पीव्ही रामप्रसाद यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ विविध कंपन्यांमध्ये काम केलं. यानंतर तो केमिकलचा व्यवसाय करू लागले.
5 / 9
पीव्ही रामप्रसाद यांनी व्यंकटेश्वरा विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पीव्ही रामप्रसाद यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ विविध कंपन्यांमध्ये काम केलं. यानंतर तो केमिकलचा व्यवसाय करू लागले.
6 / 9
पीव्ही रामाप्रसाद रेड्डी यांनी त्यांचे व्यावसायिक भागीदार नित्यानंद यांच्यासोबत १९८६ मध्ये पॉंडिचेरी येथे अरबिंदो फार्मा सुरू केली. वास्तविक नित्यानंद यांना या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव होता.
7 / 9
पीव्ही रामप्रसाद रेड्डी हे एकेकाळी एका फार्म कंपनीत क्लर्क म्हणून कार्यरत होते. येथूनच त्यांना औषधनिर्मिती क्षेत्रात काम करण्याची हिंमत मिळाली.
8 / 9
१९८६ मध्ये अरबिंदो फार्मा लाँच केल्यानंतर, फक्त ९ वर्षांनी, १९९५ मध्ये, पीव्ही रामाप्रसाद रेड्डी यांनी कंपनी सार्वजनिक केली. विशेष बाब म्हणजे औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या एपीआयवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, अरबिंदोनं फॉर्म्युलेशनमध्ये आपले स्थान निर्माण केलं आणि जेनेरिक औषध निर्मितीमध्ये एक दिग्गज बनले.
9 / 9
अरबिंदो फार्मा आज कार्डियोवस्कुलर, गॅस्ट्रोएंटेरोलॉजिकल, अँटी-डायबिटिक आणि अँटी-रेट्रोव्हायरल औषधांमध्ये आघाडीवर आहे. कंपनीच्या उत्पन्नापैकी तीन चतुर्थांश हा युरोप आणि अमेरिकेतील व्यापारातून येतो. डीएनएनच्या रिपोर्टनुसार लिस्टेड फर्म अरबिंदो फार्माचं मार्केट कॅप सध्या ५७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी