शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एका खोलीचं घर, लेकाच्या दुधासाठी पैस नव्हते; शेअर बाजाराची कमाल, आज आहेत ८०० कोटींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 9:39 AM

1 / 9
आयुष्यात अनेक अडचणी येतात. काही लोक या अडचणीतून मार्ग काढतात तर काही त्यांच्यासमोर हार मानतात. अशीच एक संघर्षाची गोष्ट आता समोर आली आहे. वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने एक तरूण दहावीत नापास झाला. त्यानंतर कमाईचे कोणतेही साधन नसतानाही लग्न केले आणि एका मुलाचा बाप झाला.
2 / 9
राहण्यासाठी फक्त एका खोलीचे घर होते. एक वेळ अशी आली की रडणाऱ्या मुलासाठी दूध आणण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पण नंतर ती व्यक्ती या सर्व अडचणींवर मात करून तब्बल ८०० कोटींचा मालक झाली आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया यांनी आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे साम्राज्य उभं केलं.
3 / 9
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा खर्च चालवण्याचे कोणतेही साधन उरले नाही. आईच्या सांगण्यावरून त्यांनी कसेतरी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि व्यवसाय करण्याचा विचार केला. पण अयशस्वी ठरले. यानंतर शेअर बाजारात व्यवहार सुरू झाले. यातून मिळणाऱ्या कमाईतून घरखर्च चालत नव्हता. दरम्यान, त्यांचे लग्नही झाले. लवकरच ते एका मुलाचा बापही झाले.
4 / 9
सुरुवातीला व्यापारातून काही पैसे मिळाले पण नंतर त्याचे मोठे नुकसान झाले. एकदा तर आईचे दागिने विकण्याची ही वेळ आली. सर्व ठीक होतंय असं वाटत असतानाच मोठं नुकसान व्हायचं.
5 / 9
एके दिवशी असं घडलं की विजय केडिया यांच्याकडे मुलासाठी दूध आणायलाही पैसे नव्हते. दूधाची किंमत त्यावेळी फक्त १४ रुपये होती. पण केडिया यांच्याकडे १४ रुपयेही नव्हते. शेवटी बायकोने इकडे तिकडे घरात ठेवलेली नाणी गोळा करून १४ रुपये जमवले.
6 / 9
१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला विजय केडिया यांनी कोलकाता सोडले आणि मुंबईला आपले घर बनवले. नशिबाने त्यांना मुंबईने साथ दिली. लवकरच १९९२ ची प्रसिद्ध बुल रन आली. अनेक गुंतवणूकदारांनी यामध्ये भरपूर पैसा कमावला. त्यापैकी विजय केडिया हे देखील एक होते.
7 / 9
त्यांनी पंजाब ट्रॅक्टर्सचे शेअर्स घेतले होते. ज्याची किंमत ३५००० रुपये होती. त्याच्या किमती पाच पटीने वाढल्या. ते विकून त्यांनी ACC चे शेअर्स विकत घेतले. वर्षभरात त्याच्या किमतीही १० पटींनी वाढल्या. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत घर घेतले आणि कुटुंबाला कोलकाताहून मुंबईत आणले.
8 / 9
केडिया यांनी काही शेअर्स विकून तीन कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले. या तिन्ही कंपन्यांचे शेअर्स १० वर्षांत १०० पटीने वाढले. आता त्यांची गणना यशस्वी गुंतवणूकदारांमध्ये केली जात आहे.
9 / 9
२००९ मध्ये त्यांनी एक दूध कंपनी विकत घेतली आणि पत्नीला भेट दिली. जेव्हा मी दुधाचे १४ रुपयेही देऊ शकत नव्हतो, त्या दिवसाची ही भेट असल्याचं त्यांनी सांगितलं. विजय केडिया आज सुमारे ८०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीshare marketशेअर बाजार