शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

One Rupee Coin Ban: 1 रुपयाचे नाणे बंद झाले? दुकानदार घेईनात, पोस्टही नाकारतेय? कुठे जमा कराल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 1:17 PM

1 / 8
प्रत्येकाच्या घरात आज सुटे पैसे गाठीला असतात. रोज काही ना काही घेता, तेव्हा सुटे पैसे तुम्हाला दिले जातात. ते काही जमवून तुम्ही दुकानदाराला परत करत नाही. परंतू, आता जर तुम्ही दुकानात गेलात तर एक रुपयाचा कॉईन घेण्यास काही दुकानदार नकार देत आहेत.
2 / 8
काही वर्षांपूर्वी १० रुपयांच्या कॉईनबाबत असे घडले होते. सध्या १ रुपयाच्या नाण्यावरून काही लोक तक्रार करत आहेत. जर तुमच्यासोबतही असेच झाले असेल आणि ते रुपयाचे नाणे कोणी घेत नसेल तर तुम्ही एका ठिकाणी हमखास ते जमा करू शकता.
3 / 8
आरबीआयने काही वर्षांपूर्वी एक नोटिफिकेशन काढले होते. २०१८-१९ मध्ये १० रुपयांची अनेक प्रकराची नाणी बाजारात आली होती. एकसारखेपणा नसल्याने ती खोटी असल्याची अफवा वाऱ्यासारखा गल्लोगल्लीत पसरली होती. यामुळे आरबीआयने ही अफवा असल्याचे सांगत हे कॉईन कुठे जमा करू शकता, ते सांगितले होते.
4 / 8
आरबीआयच्या या गाईडलाईननुसार पोस्टात तुम्ही सर्व प्रकारच्या नोटा आणि नाणी जमा करू शकता. तुम्ही एक रुपयाचे नाणे पोस्टात जमा करू शकता किंवा तिथून काही वस्तू खरेदीही करू शकता. याचाच अर्थ पोस्टाला तुमचे नाणे घ्यावेच लागणार आहे.
5 / 8
एका व्यक्तीने ट्विटरवर आरबीआय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पोस्ट ऑफिसला टॅग करून दुकानदार १ रुपयाचे नाणे घेत नाहीएत, ते बंद झाले का, असेल तर ते कुठे जमा करायचे, दुकानदार, पोस्टात ते घेण्यास नकार कसा दिला जाऊ शकतो? असा प्रश्न विचारला होता.
6 / 8
त्यावर पोस्ट कार्यालयाने ट्विट करत उत्तर दिले आहे. आरबीआयने जारी केलेली सर्व प्रकारची नाणी आणि नोटा पोस्ट ऑफिसद्वारे स्वीकारल्या जातात. तुमच्या तक्रारीवरून, संबंधित पोस्ट ऑफिसला RBI ने जारी केलेली सर्व प्रकारची नाणी आणि नोटा स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत, असे म्हणत माफी मागितली आहे.
7 / 8
भारतीय रिझर्व्ह बँकेने 26 जून 2019 रोजी अधिकृत अधिसूचनेद्वारे लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सर्व नाणी व्यवहारासाठी कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले.
8 / 8
सध्या बाजारात 50 पैसे, 1/-, 2/-, 5/- आणि 10/- रुपये या मूल्यांमध्ये विविध आकारांची, थीम आणि डिझाइनची नाणी चलनात आहेत. नाणी नोटांपेक्षा अनेक वर्षे चलनात राहतात. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर ही नाणी काढली जातात. यामुळे लोकांमध्ये गोंधळ वाढतो. याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPost Officeपोस्ट ऑफिस