शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Online Ration Card : घरबसल्या आता बनवा रेशन कार्ड; पाहा कसा कराल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 12:54 PM

1 / 7
शिधापत्रिका (रेशनकार्ड) ही केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठी नव्हे, तर महत्त्वाचे ओळखपत्र म्हणूनही वापरली जाते. पण रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ व क्लिष्ट असल्यामुळे आजही अनेकांजवळ हा दस्तावेज नसल्याचे वास्तव आहे.
2 / 7
त्यामुळे वन नेशन वन रेशनकार्ड योजनेंतर्गत ही प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आली असून, आता घरबसल्या शिधापत्रिका काढता येणार आहे. या योजनेची मुदत ३० जून २०३० अशी निश्चित केली आहे.
3 / 7
नवीन रेशनकार्ड तयार करण्यासाठी बऱ्याच कागदपत्रांची आवश्यकता असते. शिवाय सरकारी कार्यालयाचे हेलपाटेही मारावे लागतात. आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचण्यासह डोकेदुखीही कमी होणार आहे.
4 / 7
रेशन कार्डासाठी सर्वप्रथम अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ‘’अप्लाय फॉर रेशनकार्ड’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
5 / 7
तेथे नमूद केलेली कागदपत्रे जोडावी लागतील. त्यात ओळखपत्र, निवासी पत्ता, उत्पन्न हमीपत्र, जात प्रवर्ग निवडल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रांचा समावेश आहे. शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होईल. त्यांनतर पुरवठा विभागाशी संबंधित अधिकारी प्रत्यक्ष घरी येऊन पडताळणी करेल.
6 / 7
अर्जदाराने सादर केलेले हमीपत्र आणि अन्य माहितीची पडताळणी केल्यानंतर हा अधिकारी अहवाल कार्यालयात सादर करेल. त्यानंतर ३० दिवसांच्या आत पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन रेशनकार्ड घरी पाठवले जाईल.
7 / 7
या कालावधीत देशातील प्रत्येक नागरिक रेशनकार्डधारक असावा, यादृष्टीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ही योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला पत्रही पाठवले आहे. त्यामुळे आधार आणि पॅनकार्डप्रमाणे रेशनकार्डही अनिवार्य दस्तावेज केला जातोय का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
टॅग्स :onlineऑनलाइनMaharashtraमहाराष्ट्र