online sale sellers make a fool out of duplicate products know how to identify the original be aware
ऑनलाइन शॉपिंग करताय? मग फसवणूक टाळा अन् असं ओळखा ओरिजनल प्रोडक्ट्स... By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 7:38 PM1 / 8नवी दिल्ली : सध्याच्या काळात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. लोक ऑफलाइनऐवजी ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देताना दिसून येतात. दरम्यान, ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी ४ ऑगस्टपासून दोन मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट्स Amazon आणि Flipkart ने आपला सेल सुरू केली आहे. 2 / 8फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज आणि अॅमेझॉनवर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हलच्या नावाने सेल सुरू आहे.अशा परिस्थितीत, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे या सेलदरम्यान कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या सवलती देतात. 3 / 8मात्र या ऑफर आणि मोठ्या डिस्काउंटमुळे काही लोक फसवणुकीचे बळी ठरतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वत:ला फसवणूक होण्यापासून वाचवू शकता.4 / 8ई-कॉमर्स कंपन्यांवर सेल लाइव्ह झाल्यानंतर लोक घाईघाईने खरेदी करण्यास सुरवात करतात. या घाईत ते खरेदी करत असलेले उत्पादन ओरिजिनल आहे की बनावट याची खातरजमा करायलाही विसरतात. अशा परिस्थितीत ते अनेक वेळा बनावट उत्पादने खरेदी करतात आणि फसवणुकीला बळी पडतात.5 / 8ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. सर्वात आधी तुम्ही खरेदी करत असलेल्या उत्पादनाचे रेटिंग तपासा आणि त्याबद्दल लोक काय अनुभव शेअर करत आहेत, ते देखील वाचा. कोणती कंपनी ते प्रोडक्ट विकतेय हे पण बघा, त्या कंपनीबद्दल एकदा रिसर्च करा.6 / 8अशा सेलच्या वेळी तुम्ही नेहमी कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुमची फसवणूक होण्यापासून वाचता येईल. यासोबतच किंमत ट्रॅकरच्या मदतीने कंपनी किमतीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करत आहे का? याबाबत तपासून पहावे.7 / 8प्राइस ट्रॅकर वापरण्यासाठी सर्वात आधी गुगलच्या (Google) सर्च बारवर जाऊन 'buyhatke extension' टाइप करा. यानंतर गुगल एक्स्टेंशनची लिंक येईल, ज्यावर डबल क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये Buyhatke – Price tracker & Price history नावाने एक एक्स्टेंशन दिसेल. 8 / 8ते तुम्ही Add to Chrome करून तुमच्या ब्राउझरमध्ये पिन करा. नंतर जेव्हा तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनवर एखाद्या उत्पादनाबद्दल शोधता तेव्हा ते तुम्हाला त्या उत्पादनाच्या किंमतीचा संपूर्ण इतिहास दाखवते, ज्याच्या मदतीने तुम्ही फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications