Online sales companies swell! notice to 217 companies, be careful while buying goods
Online Shopping : ऑनलाइन विक्रीत कंपन्यांचा झोल! २१७ कंपन्यांना गेल्या नोटिसा, वस्तू खरेदी करताना राहा सतर्क By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 9:35 AM1 / 6एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी केली आणि ती आपल्याला हव्या त्या दर्जाची मिळाली नाही, तर समजून जा त्यात काहीतरी झोल आहे. कारण देशभरातील तब्बल २०२ कंपन्यांना सरकारने त्यासाठीच नोटिसा काढल्या असून, अनेक कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वस्तू खरेदी करताना सतर्क राहण्याची आवश्यकताही आहे.2 / 6टॅक्स वाचविण्यासाठी कंपन्या एका देशातील माल करमुक्त व्यापाराची सवलत असलेल्या देशांच्या मार्गे भारतात आणतात. त्यात माल कुठे तयार झाला यात घोळ केला जातो. समजा माल तयार झाला कोरियामध्ये; पण तो आला जपानमधून... तर त्यावर ‘मेड इन जपान’ असे लिहून त्यातून अधिक नफा कमवला जातो. २०२ कंपन्यांनी गेल्या वर्षभरात हा गैरमार्ग अवलंबल्याचे उघड झाले असून, त्यातील ७६ कंपन्यांनी आपली चूक मान्यही केली.3 / 6मेड इन चायना वस्तू मेड इन जपान दाखवून विक्री होत असेल तर ग्राहकांना त्या वस्तूच्या दर्जाबाबत तडजोड करावी लागू शकते. किमतीतही मोठा फरक होऊ शकतो. ग्राहकाला अधिकची किंमत मोजावी लागू शकते.4 / 6मोबाइल, टीव्ही आणि इतर छोट्या-मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या ‘मेड इन’च्या टॅगमध्ये हा घोटाळा होतो. काही प्रमाणात ब्रँडेड कपड्यांमध्येही अशी चलाखी केली जाते. घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये असाच घोळ होत असल्याचे पुढे आले आहे.5 / 6१५ कंपन्यांनी एक्स्पायरी डेट/बेस्ट बिफोर किंवा उत्पादन निर्मितीचा पत्ताच चुकवणे, एमआरपीपेक्षा अधिक किंमत लावणे, दर्जा चांगला नसणे असे काही घोळ केले आहेत. त्यांनाही नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.6 / 6नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइनवर ग्राहकांना तक्रार करता येते. आतापर्यंत अनेक तक्रारींचे निवारण याद्वारे करण्यात आले आहे. ग्राहकांना ऑनलाइनही तक्रार करता येते. सप्टेंबर २०२० पासून ३ हजारांपेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications