Only 11 days left for tax savings! This plan offers a good option
कर बचतीसाठी केवळ 11 दिवस शिल्लक! 'ही' योजना देते चांगला पर्याय By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 6:25 AM1 / 6नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे. अजुनही कर वाचविण्यासाठी नागरिकांना संधी आहे. ३१ मार्चपूर्वी कर सवलतीस पात्र असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कर बचतीचा लाभ होईल, शिवाय परतावाही चांगला मिळेल. त्यादृष्टीने टपाल खात्याची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना उपयुक्त ठरू शकते. 2 / 6७ टक्के व्याजदराने या योजनेत परतावा मिळतो. १ हजार रुपये किमान गुंतवणूक करता येते. ५ वर्षांचा लॉकइन पिरियड आहे. ८०सी अंतर्गत कर बचतीचा लाभ मिळतो. १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक ८० सीमध्ये करमुक्त असते. कोणतीही कमाल मर्यादा या योजनेत नाही.3 / 6मुलांच्या नावानेही खाते उघडता येते. मुलांचे वय १० वर्षांपेक्षा कमी असल्यास त्यांच्या नावाने आईवडिलांच्या वतीने खाते उघडता येते. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना त्यांचे खाते ते संचालित करू शकतात.4 / 6योजनेत सध्या वार्षिक ७ टक्के दराने व्याज मिळते. ‘रुल ऑफ ७२’ च्या हिशोबाने या योजनेतील गुंतवणूक १० वर्षे २ महिन्यांमध्ये दुप्पट होते.5 / 6लॉकइन पिरियड असल्याने ६० महिने पैसे काढता येणार नाही. २-३ वर्षांसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही योजना योग्य नाही. मॅच्युरिटी कालावधीदरम्यान अधूनमधून पैसे काढायचे असल्यास तसे शक्य नाही.6 / 6सरकारने काही वर्षांपूर्वी आधार आणि पॅन लिंक करण्याची सूचना केली होती. ३० जून २०२२ नंतर यासाठी १ हजार रुपयांचे विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. आता ३१ मार्च २०२३ ही आधार-पॅन लिंक करण्याची अखेरची मुदत असून, लिंक न केल्यास पॅन निष्क्रिय करण्यात येणार आहे. तसे झाल्यास लोकांना म्युच्युअल फंड किंवा डिमॅट खाते उघडता येणार नाही. याशिवाय कोणतेही कागदपत्र म्हणून पॅनचा वापर केल्यास १० हजार रुपयांचा दंडही बसू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications