Only invest Rs.1000 in this SBI scheme; TAX discount and many benefits
SBI च्या या स्कीममध्ये करा केवळ १००० रुपयांची गुंतवणूक; TAX सूट आणि मिळणार अनेक फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 2:26 PM1 / 8SBI Tax Savings Scheme: अनेकदा आपण आपल्या कमाईवर आकारला जाणारा टॅक्स कसा वाचवता येईल याचा विचार करतो. यासाठी आपण पर्यायांच्या शोधातही असतो. दरम्यान, टॅक्स वाचवण्यासाठी अनेक टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रूमेंट्स (Tax savings instruments) उपलब्ध आहेत. 2 / 8टॅक्स वाचवण्यासाठी, तुम्हाला टॅक्स सेव्हिंग स्कीम निवडावी लागेल. याच्या मदतीनं तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्याचा फायदा घेऊ शकता.3 / 8SBI टॅक्स सेव्हिंग स्कीम, २००६ हा असाच एक गुंतवणूकीचा पर्याय आहे. एसबीआयनं आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. एसबीआय टॅक्स सेव्हिंग स्कीमसोबत तुमची बचत वाढवा असं बँकेनं म्हटलंय.4 / 8एसबीआय टॅक्स सेव्हिंग स्कीम २००६ एफडी योजनेत किमान १ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तसंच एका वर्षात १५०००० हजार रुपयांपेक्षा रक्कम अधिक असू नये.5 / 8एसबीआय टॅक्स सेव्हिंग स्कीम २००६ मध्ये उघडण्यात येणाऱ्या खात्यासाठी किमान कालावधी पाच वर्षांचा आहे. तसंच तो जास्तीतजास्त १० वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.6 / 8SBI टॅक्स सेव्हिंग स्कीम, २००६ चा व्याज दर फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणेच आहे. अलीकडेच SBI ने टर्म डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. ५ वर्षे ते १० वर्षांपर्यंतची मॅच्युरिटी सामान्य ग्राहकांना ५.५ टक्क व्याज देईल. हे दर १५ फेब्रुवारी २०२२ पासून लागू आहेत.7 / 8एसबीआय टॅक्स सेव्हिंग स्कीम खाते ते सुरूवात केलेल्या तारखेपासून पाच वर्षांच्या समाप्तीपूर्वी काढले जाऊ शकत नाही. योजनेसोबत नॉमिनीची सुविधा देखील उपलब्ध आहे.8 / 8आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत यात कर सूट मिळू शकते. टीडीएस प्रचलित दराने लागू होतो. आयकर नियमांनुसार कर कपातीतून सूट मिळण्यासाठी ठेवीदाराकडून फॉर्म 15 /15॥ जमा केला जाऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications