शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पत्नीच्या नावे उघडा NPS अकाऊंट, महिन्याला ₹५००० गुंतवा; ₹४४७९३ चं पेन्शन, मॅच्युरिटीवर मिळतील ₹१,११,९८,४७१

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 10:40 AM

1 / 7
National Pension Scheme: जर तुम्ही तुमच्या पत्नीला काही गिफ्ट देण्याचा किंवा तिच्या नावे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने न्यू पेन्शन सिस्टिम (एनपीएस) खातं उघडू शकता. एनपीएस खात्यात पत्नीला वयाच्या ६० व्या वर्षी एकरकमी रक्कम दिली जाईल.
2 / 7
याशिवाय तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे. हे पत्नीचं नियमित उत्पन्न असेल. एनपीएस खात्याचा (NPS Account) सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दरमहा किती पेन्शन हवी हे तुम्ही स्वत: ठरवू शकता. वयाच्या ६०व्या वर्षी पत्नीला पैशांची कमतरता भासणार नाही.
3 / 7
तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने नवीन पेन्शन सिस्टीम (National Pension Scheme) खाते उघडू शकता. सोयीनुसार दरमहा किंवा वार्षिक पैसे जमा करण्याचा पर्याय आहे. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे १,००० रुपयांपासूनही एनपीएस खातं उघडू शकता. एनपीएस खातं वयाच्या ६० व्या वर्षी मॅच्युअर होतं. नव्या नियमांनुसार, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत एनपीएस खातं चालवू शकता.
4 / 7
उदाहरणाद्वारे समजून घ्या- जर तुमच्या पत्नीचं वय ३० वर्षे आहे आणि तुम्ही तिच्या एनपीएस खात्यात दरमहा ५००० रुपये गुंतवता. गुंतवणुकीवर वार्षिक १० टक्के परतावा मिळाल्यास वयाच्या ६० व्या वर्षी तिच्या खात्यात एकूण १.१२ कोटी रुपये जमा होतील. यातून तिला सुमारे ४५ लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय तुमच्या पत्नीला दरमहा सुमारे ४५ हजार रुपये पेन्शनही मिळणार आहे. त्यांना ही पेन्शन आयुष्यभर मिळत राहील.
5 / 7
तुम्ही ३० वर्षांच्या कालावधीसाठी महिन्या ५ हजार रुपये गुंतवता. या गुंतवणूकीवर अंदाजे परतावा १० टक्के टक्के मिळेल असं गृहित ठरू. यानंतर तुमचा एकूण पेन्शन फंड १,११,९८,४७१ रुपये जमा होतो, जो मुदतपूर्तीवर काढता येतो. दरम्यान, अॅन्युइटी प्लॅन खरेदी करण्यासाठी ४४,७९,३८८ रुपये रक्कम लागते. यावर अॅन्युइटी रेट ८ टक्क्यांप्रमाणे अंदाजित रक्कम ६७,१९,०८३ रुपये होते, यात तुम्हाला ४४,७९३ रुपये मासिक पेन्शन मिळतं.
6 / 7
एनपीएस ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. आपण या योजनेत गुंतवलेल्या पैशाचं व्यवस्थापन प्रोफेशनल फंड मॅनेजर्स करतात. केंद्र सरकार या प्रोफेशनल फंड मॅनेजर्सवर याची जबाबदारी देते. अशा परिस्थितीत एनपीएसमधील तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या पैशांवरील परताव्याची शाश्वती नसते. फायनान्शिअल प्लॅनर्सच्या मते, एनपीएसनं सुरुवातीपासून सरासरी १० ते ११ टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
7 / 7
(टीप - यात सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकGovernmentसरकारMONEYपैसा