शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PNB ची खास सुविधा! 250 रुपयांत उघडा 'हे' खाते, मॅच्युरिटीनंतर मिळतील 15 लाख, जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 1:33 PM

1 / 9
नवी दिल्ली : तुमच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana- SSY) आणली आली आहे. या योजनेद्वारे तुम्ही आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू शकता.
2 / 9
या योजनेत एक आई-वडील किंवा पालक एकाच मुलीच्या नावावर केवळ एकच खाते उघडू शकतात आणि दोन वेगवेगळ्या मुलींच्या नावावर जास्तीत जास्त दोन खाती उघडता येतील. याबाबत आणखी माहिती जाणून घ्या ...
3 / 9
या याजनेमध्ये किमान डिपॉझिट 250 रुपये ठेवावे लागेल. याशिवाय, तुम्ही जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांपर्यंत जमा करू शकता. हे खाते उघडल्यास तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून आणि नंतरच्या खर्चामधून तुम्हाला बराच दिलासा मिळेल.
4 / 9
सध्या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यावर (Sukanya Samriddhi Account) 7.6 टक्के दराने व्याज दिले जात होते, जे आयकर सूटसोबत आहे.
5 / 9
तुम्ही या योजनेत दरमहा 3000 रुपये गुंतवणूक करत असाल. म्हणजेच वर्षाला 36000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाउंडिंगच्या हिशोबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्षांच्या म्हणजेच मॅच्युरिटीनंतर ही रक्कम जवळपास 15,22,221 रुपये होईल.
6 / 9
सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत तुम्ही हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या कोणत्याही अधिकृत शाखेत उघडू शकता.
7 / 9
सुकन्या समृद्धि योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी फॉर्मसोबत पोस्ट ऑफिस किंवा बँकमध्ये आपल्या मुलीचे बर्थ सर्टिफिकेट (जन्म प्रमाणपत्र) जमा करावा लागेल.
8 / 9
त्याशिवाय मुलीचे आणि पालकांचे ओळखपत्र (पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि ज्याठिकाणी राहत आहात, त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, विजेचे बिल, टेलिफोन बिल, पाण्याचे बिल) द्यावे लागेल.
9 / 9
दरवर्षी किमान 250 रुपये जमा न केल्यास खाते बंद होईल आणि त्या वर्षासाठी जमा करावयाच्या किमान रकमेसह वर्षाकाठी 50 रुपये दंडासह पुन्हा चालू केले जाऊ शकते. खाते उघडण्याच्या तारखेपासून 15 वर्षापर्यंत रिअॅक्टिव्हेशन होऊ शकते.
टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकbankबँकMONEYपैसा