Opportunity to become CNG, PNG distributor Modi government will give the license
CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 3:46 PM1 / 9सीएनजी आणि पीएनजीची रिटेल डिस्ट्रिब्यूटरशिप घेण्याची आपली इच्छा असेल, तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे. पुढील काही दिवसांत यासाठी लायसन्स वितरित करण्यात येणार आहेत.2 / 9पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध शहरांत सीएनजी आणि पीएनजी वितरण लायसन्स देण्यासंदर्भात लवकरच लिलाव सुरू होणार आहेत.3 / 9प्रधान यांनी सांगितले, शहरांमध्ये गॅस वितरण करण्यासाठी लिलावाची 11वी फेरी लवकरच सुरू होईल. पीएनजीआरबी यासंदर्भात तयारीही करत आहे.4 / 9या 11व्या फेरीतील लिलाव प्रक्रियेनंतर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भातील 50 ते 100 जिल्ह्यांपर्यंत शहरी गॅस नेटवर्कची सुविधा पोहोचेल, असेही प्रधान यांनी सांगितले.5 / 9पेट्रोलियम तथा नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) 2018 आणि 2019 दरम्यान देशातील 136 भागांत वाहनांसाठी सीएनजी आणि घरांसाठी पाइप्ड नॅचरल गॅसचा (पीएनजी) स्वतःचा उद्योग करण्यासाठी लायसन्स दिले आहे.6 / 9यामुळे देशातील किमान 70 टक्के लोकसंख्या आणि 406 जिल्ह्यांपर्यंत गॅस वितरित करण्यास मदत मिळाली आहे. 7 / 9आता सरकारच्या या नव्या धोरणामुळे जवळपास 500 शहरांपर्यंत पर्यावरण पुरक ईंधन पोहोचणार आहे. 8 / 9देशभरात वापरल्या जाणाऱ्या एकूण उर्जेपैकी, नैसर्गिक गॅसचा वाटा केवळ 6.3 टक्के एवढाच आहे. 9 / 9देशभरात वापरल्या जाणाऱ्या उर्जेत 2030पर्यंत नैसर्गिक गॅसचा वाटा 15 टक्के करण्याचे लक्ष्य आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications