OPS and UPS Key Difference : OPS vs UPS: Which pension scheme has more benefits?
ओल्ड पेन्शन स्कीम vs युनिफाइड पेन्शन स्कीम; कोणत्या योजनेत जास्त फायदा? पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 8:50 PM1 / 6 OPS and UPS Key Difference : केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवृत्तीवेतन योजना सुरू केली आहे. युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) असे या योजनेचे नाव आहे. या पेन्शन योजनेद्वारे सरकार जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्स्थापित करण्याच्या विरोधकांच्या मागणीला खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. या नवीन योजनेत न्यू पेन्शन स्कीम (NPS) मधील अनेक उणिवा दूर करण्यात आल्या आहेत. 2 / 6 UPS मध्ये सरकारी कर्मचाऱ्याला खात्रीशीर पेन्शन देण्याची तरतूद आहे. हे त्याच्या नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के असेल. 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्यांनाच खात्रीशीर पेन्शन मिळेल. याशिवाय, ज्यांनी 10 वर्षे काम केले आहे, त्यांना किमान 10,000 रुपये निश्चित पेन्शन मिळेल. तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला 60 टक्के पेन्शन तत्काळ दिली जाईल. 3 / 6 जुनी पेन्शन योजना आणि युनिफाइड पेन्शन योजना, यामध्ये कोणती अधिक फायदेशीर आहे? नवीन युनिफाइड पेन्शन योजनेचे फायदे जुन्या पेन्शन योजनेच्या पातळीवर समजून घ्यायचे असतील तर 3 प्रमुख मुद्दे तपासावे लागतील. यात पेन्शनच्या गणनेपासून ते पेन्शनमध्ये कर्मचाऱ्यांच्या योगदानापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.4 / 6 कर्मचारी योगदान: UPS मध्ये सरकारने NPS सारखे कर्मचारी योगदान कायम ठेवले आहे. यूपीएसमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 10 टक्के रक्कम पूर्वीप्रमाणे भरावी लागेल, तर सरकारने त्यांचे योगदान 14 टक्क्यांवरून 18.5 टक्के केले आहे. याउलट सरकार OPS मध्ये पूर्ण योगदान देते. पेन्शनच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकही पैसा कापला जात नाही.5 / 6 पेन्शनची गणना: OPS मध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के पेन्शन म्हणून मिळत असे. हे त्याच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 50 टक्के होते. सरकारने यूपीएसमधील या तरतुदीत थोडा बदल केला आहे. आता कर्मचाऱ्याला फक्त 50 टक्के खात्रीशीर पेन्शन मिळेल, पण ते त्याच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के नसून गेल्या 12 महिन्यांच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या 50 टक्के असेल. अनेकवेळा सरकारी नोकऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत पदोन्नती मिळते, ज्यामुळे त्यांचा अंतिम पगार जास्त असतो आणि त्यानंतर पेन्शनची गणना केली जाते, परंतु हा लाभ UPS मध्ये मिळणार नाही.6 / 6 कर लाभ: सरकारने अद्याप यूपीएसमधील कर लाभ स्पष्ट केलेले नाही. पण, NPS मध्ये पेन्शनवर कर लावण्याची तरतूद आहे. NPS मध्ये सेवानिवृत्तीनंतर तुम्ही तुमचे पैसे काढले तेव्हा त्यातील 60 टक्के रक्कम करमुक्त होते. तर पगाराच्या ब्रॅकेटनुसार 40 टक्के रकमेवर कर भरावा लागणार होता. आणखी वाचा Subscribe to Notifications