Otherwise the portfolio will be zero, the stock market will be nobody's business
अन्यथा पोर्टफोलिओ होईल झिरो, शेअर बाजार हा कोणाचाच नसतो By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 1:47 PM1 / 12कष्टाची आणि मेहनतीची कमाई शेअर बाजारात गुंतविल्यावर प्रत्येकाची अपेक्षा असते की त्यात वाढ व्हावी. भविष्यात उत्तम परतावा मिळावा असे प्रत्येक गुंतवणूकदारास वाटत असते. परंतु शेअरबाजार हा कोणाचाच नसतो आणि कोणाच्याच हातात नसतो. यामुळे आपल्या पोर्टफोलिओकडे आणि ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे त्या कंपन्यांची विविध पातळीवर कामगिरी योग्य होत आहे ना हे पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक असते. 2 / 12यासाठी खरे तर फंडामेंटल आणि टेक्निकल हे टूल्स माहीत असावयास हवेत. परंतु, प्रत्येकास हे माहीत असतेच असे नाही किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी वेळही प्रत्येकाकडे नसतो. अशा सर्वांसाठी पोर्टफोलिओ सांभाळण्यासाठी अत्यंत सोप्या टिप्स देत आहे.. 3 / 12अशी घ्या पोर्टफोलिओची काळजी पोर्टफोलिओमधील शेअरवर जा. शेअरवर क्लिक करा आणि स्टॉक डिटेल्स ओपन करा. यात शेअरचा भाव वार्षिक उच्चांक पातळीवर किती आणि नीचांक पातळीवर किती हे तपासा. यालाच ५२ वीक हाय आणि लो असे म्हणतात. 4 / 12ज्या शेअर्सचे भाव ५२ वीक नीचांकी पातळीवर आहेत असे निदर्शनास आल्यास येणाऱ्या काही दिवसांत भाव अजून खाली येतो का पुन्हा वर सरकतो याकडे बारकाईने लक्ष ठेवा. भाव जर सातत्याने खाली येत असेल तर कंपनीची विविध पातळीवरील कामगिरी खराब होत आहे अशी शक्यता असू शकते. आता त्या शेअरचा चार्ट ओपन करा.5 / 12यात पाच वर्षे या ऑप्शनवर जाऊन मागील पाच वर्षांचा चार्ट डेली या निकषावर तपासा. यात गेल्या पाच वर्षांत शेअरचा भाव कसा वर खाली झाला आहे ते दिसते.6 / 12जर ५ वर्षांत भाव वाढले असतील तर उत्तम. परंतु भाव फार वाढले नसतील आणि खरेदी किमतीच्याही खूप खाली येत आहेत, हे दिसत असेल तर मात्र चिंतेचा विषय आहे असे समजावे.7 / 12आपण गुंतवणूक केलेल्या शेअर्सवर आपल्याला डिव्हिडंड मिळतो का हे पाहा. डिव्हिडंड दिला जातो म्हणजे कंपनीस नफा आहे हे गृहीत असते. त्यामुळे कंपनीचे कामकाज ठीकठाक आहे असे समजण्यास हरकत नसावी.8 / 12आपण गुंतवणूक केलेल्या शेअर्सवर आपल्याला डिव्हिडंड मिळतो का हे पाहा. डिव्हिडंड दिला जातो म्हणजे कंपनीस नफा आहे हे गृहीत असते. त्यामुळे कंपनीचे कामकाज ठीकठाक आहे असे समजण्यास हरकत नसावी.9 / 12आपल्या शेअरला नेहमीच अप्पर किंवा लोवर सर्किट लागते का हे पाहा. असे सातत्याने होत असेल तर असे शेअर्स ऑपरेटरद्वारे नियंत्रित होत असतात असे समजावे. 10 / 12नेमके काय करावे? वरील टिप्स नुसार वेळोवेळी आपला पोर्टोफोलिओ कडे लक्ष द्या. ज्या कंपन्यांचा व्यवसाय तुम्हास माहीत नाही किंवा कळत नाही अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवू नका.11 / 12कोणीतरी सांगते म्हणून किंवा अनधिकृत माहिती स्रोत कडून मिळालेल्या माहितीच्या किंवा टिप्सच्या आधारावर कोणत्याही शेअर्समध्ये रक्कम गुंतवू नका. हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.12 / 12भाव कमी म्हणजे शेअर चांगला असे अजिबात समजू नये आणि अशा पेनी स्टॉकमध्ये मोठी रक्कम गुंतवू नये. विविध सेक्टरमधील शेअर्समध्ये थोडी थोडी रक्कम गुंतवावी. म्हणजे रिस्क कमी होते. वेळप्रसंगी तोटा सहन करून खराब शेअर्समधून बाहेर पडा आणि तीच रक्कम उत्तम चालणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवा. आणखी वाचा Subscribe to Notifications