पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:35 IST
1 / 6काश्मीरची सहल पहलगाम नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण, येथे अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामचे नाव चर्चेत आलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये वसलेल्या या शहराचे नैसर्गिक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे. दरवर्षी अमरनाथ यात्रा पहलगाम येथून सुरू होते.2 / 6या शहरावर निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केल्याचे पाहायला मिळते. चहुबाजूंनी हिरव्यागार पर्वतांनी वेढलेले आणि लिद्दर नदीच्या काठावर वसलेले आहे. पहलगाम हे काश्मीरमधील अशा ठिकाणांपैकी एक आहे, जिथे दऱ्या स्वर्गासारख्या वाटतात. येथील मोकळ्या आकाशाखाली लिद्दर नदीचे निळे पाणी लोकांना अपार शांती देते.3 / 6ट्रेकिंगची आवड असलेल्या पर्यटकांसाठी पहलगाम हे स्वर्गासारखे आहे. कारण, येथे अरावली पर्वत, बेताब व्हॅली आणि चंदनवाडी सारख्या सुंदर ठिकाणी ट्रेकिंग केले जाते. याशिवाय पहलगामच्या पर्वतांमध्ये घोडेस्वारी करण्याचीही एक वेगळीच मजा आहे. याच कारणास्तव येथे अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.4 / 6शहराच्या गर्दीपासून दूर शांततेसाठी पहलगाम हे एक परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे. येथील हवा, वातावरण आणि हवामान मनाला शांती देणारे आहे. याशिवाय अमरनाथ यात्रेचा मुख्य बेस कॅम्प देखील येथे आहे.5 / 6पहलगामला जाण्यासाठी आधी श्रीनगरला जावे लागते. दिल्ली ते श्रीनगर विमान प्रवासला साधारणतः ५००० रुपये लागतात. अशा परिस्थितीत, राउंड ट्रिप भाडे १०,००० रुपये आहे. श्रीनगरहून टॅक्सीने पहलगामला पोहचू शकता. खाजगी कॅबचे भाडे २.५ ते ३००० रुपयांपर्यंत असू शकते. तुम्ही शेअरिंग बेसिसवर गेला तर ५०० ते ८०० रुपये लागतील.6 / 6याशिवाय, हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी प्रति रात्र भाडे ८०० ते १५०० रुपये आहे. ट्रेकिंगसह इतर साहसी खेळांसाठी खर्च वेगळा लागेल. अशा परिस्थितीत, प्रति व्यक्ती २०,००० रुपये खर्च करून पहलगामला सहज भेट देता येते.