शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एका पांड्याची अजब कहानी...प्रेग्नेंट झाल्यानं शेअर मार्केट वधारलं; अनेकजण बनले श्रीमंत, काय आहे भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 2:34 PM

1 / 10
स्टॉक मार्केटचं कनेक्शन कोणकोणत्या गोष्टीशी निगडीत असू शकतं? कंपन्यांची बॅलेन्स सीट, सरकार पॉलिसी अथवा कोणती आपत्ती. यामुळे शेअर मार्केटमधील चढ-उतार होऊ शकतात.
2 / 10
परंतु कोणत्या प्राण्यामुळे स्टॉक मार्केटमधून शेअर्सच्या दरात उसळी येईल असं वाटतं का?या प्राण्यामुळे गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे.
3 / 10
हा प्राणी आहे पांडा. ही कहानी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. एक पांडा प्रेग्नेट होऊ शकते या बातमीनं शेअर मार्केट वधारलं आणि गुंतवणूकदार मालामाल झाले.
4 / 10
शेअर मार्केट ३० टक्क्यांनी वधारलं. ही स्टोरी जपानची आहे. झी बिझनेसनुसार, पांडा प्रेग्नेट होण्याच्या बातमीनं शेअर मार्केटमध्ये उसळी आली. तब्बल ३० टक्क्यांनी गुंतवणूक वाढली. शेअर मार्केटमधील दोन रेस्टॉरंटच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलं.
5 / 10
जपानची राजधानी टोकियो येथील ओएनजो प्राणीसंग्रहालयात एक पांडा आहे. ज्याच्या गर्भवती असल्याची बातमी समोर आली. या प्राणीसंग्रहालयात पांडा सर्वात आकर्षित प्राणी आहे
6 / 10
त्यामुळे येणाऱ्या काळात प्राणीसंग्रहालयात पांडाला बघायला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढेल अशी गुंतवणूक दारांची आशा आहे.
7 / 10
या बातमीचं महत्त्व लक्षात घेता प्राणीसंग्रहालयाच्या बाहेर असलेल्या रेस्टॉरंट कंपन्यांना त्याठिकाणी चांगला नफा मिळू शकतो असं गुंतवणूकदारांना वाटतं. त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रमाणात २ रेस्टॉरंटच्या शेअर्स खरेदी केले.
8 / 10
शियोकेन नावाच्या रेस्टॉरंटचे शेअर्समध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली तर जपानच्या टोटेनको नावाच्या रेस्टॉरंटच्या शेअर्समध्ये जवळपास २९ टक्क्यांनी प्रंचड वाढ झाल्याचं दिसून येते. प्राणी संग्रहालयातील पांडा प्रेग्नेट झाला म्हणून दोन्ही रेस्टॉरंटच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
9 / 10
कोरोना संक्रमणामुळे मागील वर्षभरापासून प्राणी संग्रहालय बंद आहे. डिसेंबरपासून बंद असणारं हे प्राणी संग्रहालय अखेर ४ जून रोजी लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. अनेक लोक या प्राणीसंग्रहालयाला दरवर्षी भेट देत असतात.
10 / 10
२०१७ मध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. जेव्हा शिनशिन नावाच्या एका पांडाने बछड्याला जन्म दिला. तेव्हाही स्टॉक मार्केटमध्ये उसळी आली होती. टोटेनको रेस्टॉरंटच्या शेअर्सचे भाव वधारले होते.
टॅग्स :share marketशेअर बाजार