शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Patanjali Share: बाबा रामदेव यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, ५ वर्षांत ५४०० टक्के रिटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 4:01 PM

1 / 6
योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पतंजली फुड्सच्या (Patanjali Foods Share) शेअरनं गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत. काही रिसर्च फर्मदेखील खरेदीचा सल्ला देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पतंजली फुड्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे.
2 / 6
सोमवारीदेखील कंपनीच्या शेअरमधील वाढीचं सत्र कायम होतं. कामकाजादरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं. कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ होऊन ते 1318.95 रूपयांवर पोहोचले आहेत.
3 / 6
बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली फुड्स ही पूर्वी रुची सोया म्हणून ओळखली जात होती. सध्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवार, 2 ऑगस्ट रोजी, त्याचे शेअर्स BSE वर कामकाजादरम्यान कंपनीचे शेअर्स 1,266.75 रूपयांवर पोहोचले होते. परंतु कामाजाच्या अखेरच्या सत्रात ते 1,261.30 रूपयांवर बंद झाले होते.
4 / 6
दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्सने 105 टक्के रिटर्न दिले आहेत. तर दुसरीकडे शेअर्सच्या गेल्या पाच वर्षांच्या वाढीकडे पाहिलं तर कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना 5400 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. एवढेच नाही तर ज्या गुंतवणूकदारांनी या वर्षी कंपनीच्या एफपीओमध्ये पैसे गुंतवले असतील, त्यांची गुंतवणूक आता दुप्पट झाली असेल.
5 / 6
बाबा रामदेव यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली वाढ पाहून रिसर्च फर्म्सही या खरेदीला फायदेशीर म्हणत आहेत. पतंजली फुड्सला BUY रेटिंग देत देशांतर्गत संशोधन संस्था Antique ने त्यांच्या शेअर्ससाठी प्रति शेअर 1725 रूपयांचे टार्गेट ठेवले आहे. कंपनीच्या तज्ञांचे म्हणणे आहे की कंपनीची पुढील आर्थिक वर्षापर्यंत चांगली कामगिरी सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे आणि ती 22 टक्क्यांपर्यंत रेव्हेन्यू देऊ शकते.
6 / 6
सध्या, बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स (PATANJALI FOODS MCap) चे मार्केट कॅप सुमारे 45,658.41 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2017 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे 26 रुपये होती. सप्टेंबर 2020 पर्यंतच्या तीन वर्षांत या शेअरची किंमत 613 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याच वेळी, सोमवार 5 सप्टेंबर रोजी शेअरची किंमत 1,317.90 रुपयांपर्यंत गेली आहे. पतंजली फुड्स ही खाद्यतेलाचे उत्पादन करणारी देशातील आघाडीची कंपनी आहे.
टॅग्स :patanjaliपतंजलीBaba Ramdevरामदेव बाबाInvestmentगुंतवणूकshare marketशेअर बाजार