शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paytm च्या IPO ला समभागधारकांची मान्यता; १६,६०० कोटी रुपये उभारणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 4:48 PM

1 / 13
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच बाजारात अनेकाविध क्षेत्रातील कंपन्यांचे IPO येऊन धडकत आहेत.
2 / 13
त्यामुळे गुंतवणूकदारांना उत्तमोत्तम संधी प्राप्त होत असल्याचे सांगितले जात आहेत. तर कोरोना संकटाच्या काळातही अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात तेजीत आले असून, चांगले रिटन्सही कंपन्या देत आहेत. (Paytm IPO)
3 / 13
यातच आता Paytm कडून मोठा IPO सादर होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून, कंपनीतील समभागधारकांनी याला मान्यता दिल्याचे सांगितले जात आहे.
4 / 13
या पार्श्वभूमीवर समभागधारकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. 'पेटीएम'च्या आयपीओला चालना देणार आहे. लवकरच कंपनीकडून सेबीकडे आयपीओचा प्रस्ताव सादर केला जाईल.
5 / 13
नोव्हेंबर २०२१ पर्यंत पेटीएमचा शेअर भांडवली बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. तसेच सुमारे १६ हजार ६०० कोटींच्या IPO ला मान्यता देण्यात आल्याचे समजते.
6 / 13
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचे कंपनीचे प्रवर्तक म्हणून अवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे आयपीओसाठीची पात्रता सोपी झाली आहे.
7 / 13
पेटीएमने जवळपास २४ ते ३० अब्ज डॉलर्सच्या दरम्यान बाजार मूल्याची अपेक्षा केली आहे. सध्याच्या घडीला पेटीएमचे बाजार मूल्य १६ अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे.
8 / 13
पेटीएममध्ये Ant ग्रुप आणि अलिबाबा यांची पेटीएमची मुख्य कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशनमध्ये जवळपास ३८ टक्के हिस्सेदारी आहे. तर, सॉफ्टबँकेचा यामध्ये १८.७३ टक्के हिस्सा आहे. तर एलिवेशन कॅपिटलची वन ९७ कम्युनिकेशनमध्ये १७.६५ टक्के हिस्सेदारी आहे.
9 / 13
आयपीओच्या नियोजनासाठी पेटीएममध्ये नुकताच संचालक मंडळात फेरबदल केले होते. दरम्यान, One97 Communication च्या संचालक मंडळावरून सर्व चिनी नागरिक हटले आहेत.
10 / 13
यामध्ये प्रमुख गुंतवणूकदार Ant समुहाच्या प्रतिनिधिंचाही समावेश असेल. या समुहाचं प्रतिनिधीत्व आता अमेरिकेतील फ्लोरिडा येथील डॉगलस फिगिन हे करणार आहेत.
11 / 13
या कंपनीच्या जवळपास ३९ सब्सिडायरीस आहेत. पेटीएमच्या प्रमुख शेअरधारकांमध्ये चीनच्या अलिबाबा समुहाच्या अँट ग्रुप, सॉफ्टबँक व्हिजन फंड, सॅफ पार्टनर्स यांचा समावेश आहे.
12 / 13
पेटीएमची पेरेंट कंपनीनं रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला दिलेल्या माहितीनुसार Ant फायनॅन्शिअलचे गुओमिंग चेंग आणि अलिपेचे जिंग शियांगडोंग यांनी कंपनीतील आपले पद सोडले आहे. हे दोन्ही चिनी नागरिक आहेत.
13 / 13
त्यांच्याशिवाय अमेरिकन नागरिक मायकल युएन जेयाओ आणि चिनी नागरिक तिंग हांग केन्नी यांनीदेखील आपले अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक अशित लिलानी आणि विकास अग्निहोत्री यांचादेखील कंपनीच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.
टॅग्स :Paytmपे-टीएमIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketशेअर बाजार