शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मस्तच! PayTm चे नवे डेबिट कार्ड लॉंच; वापरा आणि डिस्काऊंट, कॅशबॅक मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 6:38 PM

1 / 13
डिजिटल व्यवहारांमध्ये सर्वांत आघाडीवर असलेल्या PayTM ने आपल्या बँकिंग सेवांचा विस्तार केल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 13
PayTM पेमेंट्स बँक लिमिटेडने नुकतेच एक डेबिट कार्ड लाँच केले आहे. याआधी पेटीएमने व्हर्च्युअल डेबिट कार्ड बाजारात आणले होते.
3 / 13
मात्र, आता व्हिसाचे फिजिकल डेबिट कार्ड PayTM कडून लॉंच करण्यात आले आहे. या कार्डचे अनेक फायदे असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 13
आतापर्यंत PayTm ने तब्बल ४५ लाख व्हर्च्युअल डेबिट कार्डस वितरीत केल्याचे सांगितले जात आहे. आता नव्याने आणलेल्या फिजिकल डेबिट कार्डचा वापर अन्य बँकिंग डेबिट कार्डप्रमाणे करणे शक्य होणार आहे.
5 / 13
PayTm डेबिट कार्ड दुकानात किंवा मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर स्वाईप करून पैसे अदा करू शकता. हे डेबिट कार्ड मिळवण्याची पद्धत एकदम सोपी आणि सहज असल्याचे सांगितले जात आहे.
6 / 13
तुम्ही PayTm App चा वापर करून या कार्डासाठी अप्लाय करू शकता. बँक सेक्शनमध्ये जाऊन त्याठिकाणी असलेला Manage Card हा पर्याय निवडावा.
7 / 13
त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला Upgrade to Visa Debit Card हा ऑप्शन दिसेल.
8 / 13
तुमच्याकडे व्हर्च्युअल कार्ड असेल तर तर तुम्ही ते कार्ड अपग्रेड करु शकता. PayTm Visa Debit कार्डावर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतील. केवळ भारतात नाही, तर परदेशात गेल्यानंतरही तुम्ही हे डेबिट कार्ड वापरु शकता.
9 / 13
PayTm डेबिड कार्डच्या वापरावर घसघशीत डिस्काऊंट आणि कॅशबॅक मिळू शकेल. तसेच कॉन्टॅक्टलेस पेमेंट, एटीएम स्वाईप सुविधा आणि ऑनलाईन खरेदी अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
10 / 13
PayTm सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात १० लाख फिजिकल डेबिट कार्डस वितरीत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापूर्वी PayTM पेमेंट्स बँक लिमिटेडने ग्राहकांसाठी FD ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
11 / 13
केवळ १०० रुपये भरून PayTM बँकेचे एफडी खाते सुरू करता येणार आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेने इंडसइंड बँकेच्या सहकार्याने पेटीएम ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणली आहे.
12 / 13
विशेष म्हणजे तुम्ही काही महिन्यानंतर एफडी ब्रेक केली तर तुमच्याकडून कोणताही अतिरिक्त दंड आकारला जात नाही. या योजनेची सविस्तर माहिती ग्राहकांना संकेतस्थळावरही पाहता येईल.
13 / 13
पेटीएम पेमेंट्स बँक फिक्स्ड डिपॉझिटची मॅच्युरिटी ३६५ दिवसांसाठी आहे. या मॅच्युरिटीवरील व्याज ६ टक्के आहे. यात पासबुकची सुविधाही देण्यात आली आहे.
टॅग्स :Paytmपे-टीएमbusinessव्यवसाय