paytm launches postpaid mini to provide small loans to users
Paytm युजर्ससाठी खूशखबर! 60,000 रुपयांपर्यंत त्वरित कर्ज मिळणार, जाणून घ्या सविस्तर... By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 9:06 PM1 / 8नवी दिल्ली : जर तुम्ही पेटीएमचे (Paytm) युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता पेटीएमवर 60 हजार रुपयापर्यंतचे कर्ज काही मिनिटांत मिळेल. 2 / 8पेटीएमने आपल्या बाय नाऊ, पे लेटर सेवेचा (Buy Now, Pay Later service) विस्तार करत पोस्टपेड मिनी (Postpaid Mini) लाँच केले आहे. या माध्यमातून कंपनी छोटी-मोठी कर्ज देईल.3 / 8कंपनीने यासाठी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडसोबत (Aditya Birla Finance Ltd) भागीदारी केली आहे. छोट्या तिकिट त्वरित कर्जे (small-ticket instant loans) ग्राहकांना फ्लेक्सिबिलिटी देतील आणि कोरोना व्हायरस महामारी दरम्यान लिक्विडिटी कायम ठेवण्यासाठी घरगुती खर्च व्यवस्थापित करतील, असे कंपनीने म्हटले आहे.4 / 8पोस्टपेड मिनीच्या लॉन्चिंगसोबत कंपनी 60,000 रुपयांच्या इन्स्टंट क्रेडिटशिवाय 250 ते 1000 रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. या कर्जामुळे युजर्सना मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज, गॅस सिलिंडर बुकिंग, वीज आणि पाण्याची बिले यासारखी मासिक बिले भरण्यास मदत होईल. 5 / 8तसेच, पेटीएम पोस्टपेड मिनीद्वारे ग्राहक पेटीएम मॉलवर खरेदी करू शकतात. पेटीएम लेंडिंगचे सीईओ भावेश गुप्ता म्हणाले की, आम्ही पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी नवीन सुविधा सुरू करत आहोत. या माध्यमातून त्यांच्यात आर्थिक शिस्तही निर्माण होईल.6 / 8या पोस्टपेड सुविधेद्वारे आम्ही अर्थव्यवस्थेतील खप वाढविण्यासाठी एक गंभीर प्रयत्न करीत आहोत. आमच्या नवीन पोस्टपेड सेवेद्वारे, युजर्स त्यांचे बिले आणि थकबाकी वेळेवर भरण्यास सक्षम होतील, असे भावेश गुप्ता यांनी सांगितले.7 / 8पेटीएम पोस्टपेड सेवेद्वारे शून्य टक्के व्याजावर कर्जाची परतफेड करण्यासाठी 30 दिवसांपर्यंतची मुदत देत आहे. यामध्ये कोणतीही वार्षिक फी किंवा अॅक्टिव्हेशन चार्ज नाही आहे. मात्र, यामध्ये फक्त किमान सुविधा फी (convenience fee) असणार आहे.8 / 8पेटीएम पोस्टपेडद्वारे युजर्स देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन मर्चेट स्टोअरवर पेमेंट करू शकतात आणि त्यांच्या मासिक बजेटमध्ये घोटाळा होण्याची कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. पेटीएम पोस्टपेड देशातील 550 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications