शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paytm शेअरची होरपळ सुरुच! कंपनीला झाला प्रचंड तोटा; गुंतवणूकदारांचे लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 5:34 PM

1 / 9
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. यातच मोठा गवगवा करून शेअर मार्केटमध्ये सादर करण्यात आलेला Paytm कंपनीचा शेअर सुपर फ्लॉप ठरल्याचे चित्र आहे.
2 / 9
Paytm च्या शेअर बाजारात होरपळ झाली असून आतापर्यंत तो ५० टक्क्यांहून अधिक कोसळला आहे. डिजिटल पेमेण्‍ट्स व आर्थिक सेवा कंपनी पेटीएमची मालक वन ९७ कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडला ७७८ कोटींचा तोटा झाला आहे.
3 / 9
ऑक्‍टोबर-डिसेंबर या तिमाहीदरम्‍यान कंपनीचा महसूल वार्षिक ८९ टक्‍क्‍यांनी वाढून १४५६ कोटी इतका झाला. कंपनीने सरासरी ६४.४ मंथली ट्रान्‍झॅक्टिंग युजर्सचा सक्रिय सहभाग आणि २.५ लाख कोटी रूपयांच्या जीएमव्‍हीची देखील नोंद केली.
4 / 9
आमचा व्‍यवसाय ग्राहक, व्‍यापा-यांना पेमेण्‍ट्स सुविधा देण्‍यासोबत क्रॉस-सेल उच्‍च-मार्जिन आर्थिक सेवा व व्‍यापार देण्‍याचा आहे. क्‍लाऊड व कॉमर्स सेवांमधून देखील महसूल ६४ टक्‍क्‍यांनी वाढून ३३९ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. कंपनीच्‍या तिस-या तिमाहीमधील निष्‍पत्तींचा बहुतांश भाग वाढलेल्‍या आर्थिक सेवांमधून दिसून आला.
5 / 9
आर्थिक वर्ष २०२२ च्‍या तिस-या तिमाहीमध्‍ये वितरित करण्‍यात आलेली वैयक्तिक कर्जे वार्षिक १,१८७ टक्‍क्‍यांनी वाढली, तर वैयक्तिक कर्जांचे मूल्‍य वार्षिक १,९२५ टक्‍क्‍यांनी वाढले.
6 / 9
आर्थिक वर्ष २०२२ च्‍या तिस-या तिमाहीमध्‍ये वितरित करण्‍यात आलेले मर्चंट लोन्‍स वार्षिक ३८ टक्‍क्‍यांनी वाढले, तर मर्चंट लोन्‍सचे मूल्‍य वार्षिक १२८ टक्‍क्‍यांनी वाढले. २५ टक्‍क्‍यांहून अधिक कर्जे नवीन कर्जदात्‍यांना देण्‍यात आली.
7 / 9
सरासरी कर्ज मूल्‍य वाढत गेले, जे आता १२०,००० रू. ते १४०,००० रूपये आहे, तर सरासरी मुदत १२ ते १४ महिने होती. आर्थिक वर्ष २०२१ व आर्थिक वर्ष २०२२ दरम्‍यान कंपनीच्‍या योगदान नफ्यामध्‍ये लक्षणीय बदल दिसण्‍यात आला आहे.
8 / 9
आर्थिक वर्ष २०२२ च्‍या तिसऱ्या तिमाहीसाठी योगदान नफा वार्षिक ५६० टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ४५४ कोटी रुपये राहिला. कंपनीचा खर्च देखील महसूलाच्‍या टक्‍केवरीशी तुलना करत लक्षणीयरित्‍या कमी होत आहे.
9 / 9
पेटीएमच्या शेअरमध्ये बाजारात दाखल झाल्यापासून प्रचंड घसरण झाली आहे. आतापर्यंत पेटीएमचा शेअर ५० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. आयपीओमध्ये प्रती शेअर २१५० रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी तो बाजारात सूचीबद्ध झाला.त्याने ८७५.५० रुपयांचा नीचांकी स्तर गाठला आहे.
टॅग्स :Paytmपे-टीएम