शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paytm युजर्ससाठी Good News! आता इंटरनेटशिवाय करू शकता पेमेंट, जाणून घ्या 'हे' फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 5:36 PM

1 / 9
नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपल्या जीवनात अनेक बदल घडून आले आहेत. आम्ही आता डिजिटल पेमेंटकडे जात आहोत. आपल्या खिशात पैसे नसले तरी स्मार्टफोनवर फक्त एका क्लिकवर डिजिटल पेमेंट अॅप्सच्या मदतीने आम्ही सहज पेमेंट करू शकतो.
2 / 9
पेटीएम (Paytm) आणि गुगल पे (Google Pay) सारखी अॅप्स इंटरनेटवर काम करतात आणि डिजिटल पेमेंटचे लोकप्रिय माध्यम आहेत. आज आम्ही तुम्हाला पेटीएमच्या अशा फीचरबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकाल.
3 / 9
युजर्ससाठी आपल्या अॅपचा अनुभव अधिक खास बनवण्याच्या प्रयत्नात, पेटीएमने टॅप टू पे (Tap to Pay) नावाचे एक नवीन फिचर जारी केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही पेटीएम अॅप न उघडता आणि इंटरनेट न वापरता पेमेंट करू शकता.
4 / 9
हे फीचर कसे काम करते आणि तुम्ही ते तुमच्या फोनवर कसे अॅक्टिव्ह करू शकता, ते पाहूया. जर तुम्हाला इंटरनेट न वापरता पेटीएम अॅपवरून पेमेंट करायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, पेटीएमचे हे नवीनतम फीचर एनएफसीवर (NFC) आधारित आहे आणि म्हणूनच हे एकमेव फीचर आहे, जे इंटरनेटशिवाय काम करते.
5 / 9
दरम्यान, हे फीचर सध्या फक्त Android युजर्संसाठी उपलब्ध आहे, कारण iOS युजर्स एनएफसीला केवळ Apple Pay द्वारे वापरू शकतात, जे सध्या भारतात उपलब्ध नाही.
6 / 9
तुमच्या Android स्मार्टफोनच्या पेटीएम अॅपवर हे फीचर अॅक्टिव्ह करण्यासाठी, पहिल्यांदा तुमचे पेटीएम अॅप लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा. यानंतर, अॅप उघडा, 'टॅप टू पे' पर्याय निवडा, त्यानंतर स्क्रीनच्या तळाशी 'अॅड न्यू कार्ड' पर्याय निवडा आणि तुमचे कार्ड डिटेल्स सेव्ह करा.
7 / 9
जर तुम्ही तुमचे कार्ड आधीच सेव्ह केले असेल तर या स्टेपकडे दुर्लक्ष करा. यानंतर तुम्हाला ज्या कार्डसाठी हे फीचर अॅक्टिव्ह करायचे आहे, ते कार्ड निवडा. हे केल्यानंतर, तुमचे कार्ड व्हेरिफाय करा, ज्यासाठी तुमच्या फोनवर वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP येईल, तो फीड करा.
8 / 9
अशा प्रकारे तुमच्या फोनवर टॅप टू पे फीचर अॅक्टिव्ह होईल. हे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमचा फोन PoS मशीनवर टॅप करावा लागेल आणि ट्रांजेक्शन पूर्ण होईल.
9 / 9
लक्षात ठेवा की, हे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनवर एनएफसीचा पर्याय ठेवावा लागेल. तसेच, या फीचर अंतर्गत पेमेंट करण्याची कमाल मर्यादा रुपये 5000 आहे, त्यानंतर तुम्हाला PoS मशीनवरच पिन टाकावा लागेल.
टॅग्स :Paytmपे-टीएमtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय