शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paytm Crisis: काय आहे Paytm चं China कनेक्शन, ज्याचा तपास करतंय भारत सरकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 8:40 AM

1 / 7
ऑनलाइन पेमेंट सेवा देणाऱ्या पेटीएम कंपनी समोरील समस्या (Paytm Crisis) कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. ३१ जानेवारी रोजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) कंपनीच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केल्यावर, पेटीएम बँकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे राजीनामे सुरू झाले. आता पेटीएमचं चीन कनेक्शन (Paytm China Connection) चर्चेत आहे, ज्याची सरकार चौकशी करत आहे.
2 / 7
पीटीआयच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलंय की सरकार पेटीएमची पॅरेंट कंपनी वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडची (One97 Communication Ltd) बँकिंग कंपनी पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये (Paytm Payment Bank) चीनशी थेट परदेशी गुंतवणूकीचा (China FDI In PPSL) तपास करत आहे. चीनमधील आघाडीच्या कॉर्पोरेट ग्रुप अँट ग्रुपनं (China Ant Group) पेटीएममध्ये गुंतवणूक केल्याचं सांगण्यात येत आहे.
3 / 7
नोव्हेंबर २०२० मध्ये, पेटीएम पेमेंट बँकेनं (PPSL) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) पेमेंट अॅग्रीगेटर आणि पेमेंट गेटवे म्हणून काम करण्यासाठी परवान्यासाठी अर्ज केला होता. परंतु, नोव्हेंबर २०२२ मध्ये आरबीआयनं तो फेटाळला आणि पेटीएम पेमेंट बँकेला एफडीआय नियमांतर्गत प्रेस नोट-३ चं पालन करण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर १४ डिसेंबर २०२२ रोजी One97 Communications Limited नं नवीन अर्ज दिला होता.
4 / 7
पेटीएमच्या संकटादरम्यान एफडीआय तपासाच्या नव्या अडचणीत, एफडीआय नियमात प्रेस नोट-३ चा अर्थ काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे? कोविड संकटानंतर, सरकारनं भारतासोबत जमीन सीमा लागत असलेल्या देशांना कोणत्याही क्षेत्रात परकीय गुंतवणुकीपूर्वी (FDI) मंजुरी घेणं बंधनकारक केलं होतं.
5 / 7
आता सरकार पेटीएमबाबतही याची चौकशी करत आहे. पीटीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटीएममधील चीनच्या गुंतवणूकीबाबत पेटीएम पेमेंट बँकेची एक आंतर-मंत्रालयीन समिती चौकशी करत असून चौकशीनंतर निर्णय घेतला जाणार आहे.
6 / 7
३१ जानेवारी रोजी आरबीआयनं पेटीएम पेमेंट बँकेच्या सेवा २९ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा आदेश जारी केला होता. रिझर्व्ह बँकेनं नियमांचं पालन न केल्यामुळे आणि सुपरव्हायझरी चिंतांबद्दल पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध नियामक कारवाईचे आदेश दिले होते.
7 / 7
बँकेनं ग्राहकांची खाती, वॉलेट्स, फास्टॅग, एनसीएमसी कार्डमध्ये ठेवी, व्यवहार, प्रीपेड आणि टॉप-अप थांबवण्यास सांगितलं आहे. यासोबतच २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणताही नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र, त्यानंतर पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी एका टाउनहॉलमध्ये हे प्रकरण लवकरच सोडवलं जाणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.
टॅग्स :Paytmपे-टीएमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकchinaचीनInvestmentगुंतवणूक